स्वरूपाताई थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद.
(भोर):-संपादक न्यूज वार्ता नेटवर्क
२०३- भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार .संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्षा .स्वरुपाताई थोपटे यांनी मुळशी तालुक्यातील बावधन, भुगाव, भुकूम, पिरंगुट, लवळे या गावांमध्ये गाव भेट दौरा करून नागरिकांची संवाद साधत प्रचार दौरा केला.
प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सविताताई दगडे, मुळशी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला अध्यक्षा सुरेखाताई तोंडे, काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष निकिताताई सणस, कार्याध्यक्ष सविताताई गव्हारे, यांच्यासह सारिकाताई शिंदे, राहुल जाधव, मोहन गोळे, ललिताताई पवळे, गौरीताई गोळे, सारिकाताई कळमकर, अर्चनाताई सुर्वे, पोपटभाऊ कळमकर, मंगेश दगडे, गणेश पवळे, सौरभ गोळे आदी मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.