मुळशीकर स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबत - आ. संग्राम थोपटे.
भोर( प्रतिनिधी):-राम पाचकाळे
२०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तालुक्यातील रावडे, खुबवली, आसदे, शिळेश्वर, भादस, संभवे, माले, शेरे, दिसली, जामगाव, अकोले, कळमशेत, आंदेशे, मांदेडे, खेचरे, बेलावडे, चिंचवड, कोंढावळे, पौड, विठ्ठलवाडी, गडदावणे या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की मुळशी तालुक्यातील स्वाभिमानी जनता ही केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून सदैव माझ्यासोबत राहिली आणि यापुढेही माझ्या पाठीमागे भक्कम उभी राहील याची मला पूर्ण खात्री आहे.आपण आजवर दिलेल्या आशीर्वादामुळेच या भागातील अनेक छोटे-मोठे महत्त्वाचे रस्ते, पूल, सभा मंडप, शाळा इमारती, समाजमंदिर, पाणीपुरवठा योजना, या कामासाठी निधी उपलब्ध करून देता आला त्याचबरोबर बावधन येथे प्रांत कार्यालय व पौड येथे तहसिल कार्यालय निधी उपलब्ध केल्याने सर्वसामान्य जनतेची काम लवकर मार्गी लागतील, त्याचप्रमाणे भरे येथील क्रीडा संकुलही उभारण्यासाठी निधी उपलब्ध करता आला. पी.एम आर.डी.ए.अंतर्गत येणाऱ्या गावांना निधी उपलब्ध करून देता आला. याचे मला समाधान वाटते, त्याचबरोबर या भागातील पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उद्योगधंदे यांना चालना देण्यासाठी विशेष लक्ष घालून प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष महादेवअण्णा कोंढरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख सचिन खैरे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सविताताई दगडे, संतोष मोहोळ, रामभाऊ ठोंबरे, मा.सभापती कोमलताई वाशिवले, महिला काँग्रेसचे अध्यक्षा निकिताताई सणस, शिवसेना महिला संघटिका सुरेखाताई तोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्षा दीपालीताई कोकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.