महायुतीमध्ये अंतर्गत प्रचंड नाराजी, हे पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत.
(संपादक न्यूज वार्ता नेटवर्क):-राम पाचकाळे.
विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतसे भोर विधानसभा मतदारसंघ व्होल्टेज हाय पावरफुल मोडवरती आल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस अंतर्गत नाराजी ,अंतर्गत मतभेद आणि महायुतीचे पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अपक्ष उमेदवार यांनी आज अर्ज दाखल केल्याने भोर विधानसभा मतदारसंघात मोठ्या चर्चांना उधाण आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे वतीने विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना काँग्रेसकडून उमेदवारी तथा महा विकास आघाडीच्या वतीने निश्चित करण्यात आलेले आहे.
मात्र युतीचा उमेदवार अजूनही ठरत नाही या प्रश्नाचे उत्तर काय हे जनता देखील मतदार देखील मोठ्या प्रमाणात संभ्रम अवस्थेमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तसेच शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी अजूनही अधिकृत घोषणा नाही त्यामुळे महायुतीमध्ये जागेस संदर्भात मोठ्या प्रमाणावर घमासान आपल्याला दिसून येत आहे युतीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे, यामध्ये भोर विधानसभेचे भाजपचे निवडणूक समन्वयक किरण दगडे यांनी अपक्ष तर भाजपचे भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी भाजपकडून ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यामुळे आता युतीचा उमेदवार नक्की कोणता असेल अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे ,राजकीय जाणकारांनी न्यूज वार्ताशी बोलताना सांगितले आहे की युतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे चित्र सध्या दिसून येत आहे, फॉर्म माघारी घेण्याच्या काळात बंडखोरांना रोखणं हे पक्षश्रेष्ठींसाठी मोठ्या आव्हानाचे ठरणार असल्याचे दिसून येते आहे