शंकर मांडेकरांकडून राष्ट्रवादी पुन्हा, भोरची उमेदवारी जाहीर
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले पत्र जाहीर, भोर विधानसभेत होणार मोठी चुरस
मुंबई :●संपादक न्यूज वार्ता●
भोर विधानसभेचा निवडणूक ज्वर अधिकाधिक तापू लागलेला असताना यामध्ये महायुतीचा उमेदवार मागील काही दिवसापासून आज जाहीर होईल ,उद्या जाहीर होईल याची उत्सुकता तमाम मतदारांना लागली होती, शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांचे नाव जाहीर होईल असे अनेकांना वाटत होते ,तसेच रणजीत शिवतरे व भाजपचे किरण दगडे या रेसमध्ये होते,मात्र घडलंच अनाकलनीय.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून भोर विधानसभेसाठी शंकर हिरामण मांडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.अत्यंत अटीतटी च्या स्पर्धेत महायुतीच्या सर्व इच्छुक उमेदवारांना डावलून महाविकास आघाडी चे शंकर मांडेकर यांची महायु्तीकडून उमेदवारीसाठी बाजी.महायुतीच्या रस्सीखेचमध्ये हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्याचे त्यामुळे निश्चित झाले आहे. शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी समाज माध्यमावर ही उमेदवारी जाहीर केली . त्यामुळे भोर मतदार संघात लढाई चुरशीची होणार आहे. सलग ३ वेळा मतदारसंघावर विजयी घौडदौड राखणाऱ्या संग्राम थोपटेना आता मुळशीकर मांडेकर यांचे आव्हान असणार आहे.
- मांडेकर हे मुळशीतील नेतृत्व म्हणून गणले जाणारे कार्यकर्ते . चांदे गावच्या सरपंच पदावरून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला आहे. शरद पवार व अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी पक्षाची यशस्वी धुरा त्यांनी मुळशी तालुक्यात सांभाळली आहे. तदनंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून राजकीय वाटचाल कायम ठेवली.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या संग्राम थोपटे यांचे वारू रोखण्याची जबाबदारी महायुतीने मांडेकर यांच्या सोपवली हीच संधी साधत मुळशी तालुक्यातून मोठे पाठबळ असलेल्या मांडेकर यांना महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून उमेदवारी जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. त्यामुळे उद्या 29 ऑक्टोबर 2024 रोजी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला निघालेल्या शंकर मांडेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना सुखद धक्का मिळाला आहे. उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन करत मांडेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख असलेल्या मांडेकरांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी जाहिर झाल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे.
शिवसेना( शिंदे गट )कुलदीप कोंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. काल दिनांक 28 रोजी शिवसेनेचे शिंदे गटाचे बाळासाहेब चांदेरे भारतीय जनता पक्षाचे किरण दगडे व भारतीय जनता पक्षाचे भोर अध्यक्ष जीवनाप्पा कोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या तरी भोरमध्ये एकाच एक लढत होण्याचे चित्र दिसत नाही
.