मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश !

Maharashtra varta

 मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश !



मुळशी( प्रतिनिधी):-

मुळशी तालुक्यातील मौजे ताम्हिणी गावच्या उपसरपंच सौ.सविताताई अण्णा कोकरे यांच्यासह माजी सरपंच अर्जुन मरे, रवींद्र कोकरे, अनंता कोकरे, सचिन कोकरे, आप्पा कोकरे, अनिल मरे, राजू मरे, वेदांत मरे तसेच राजगड तालुक्यातील कुसार पेठ येथील अनिल कचरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे अभिनंदन करून पक्षात स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासो राऊत, भोर विधानसभा युवक अध्यक्ष अमोल पडवळ, भोर विधानसभा मा.युवक अध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब ढेबे, राजगड तालुका युवक काँग्रेस शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top