मुळशी तालुका गावभेट दौरा निमित्त नागरिकांशी सवांद साधला - आमदार संग्राम थोपटे
(न्यूज वार्ता):-संपादक टीम
विकास कामाच्या माध्यमातून मुळशीकर जनतेच्या समस्या सोडविता आल्या.यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की मुळशी तालुक्यातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावता आली यामध्ये प्रमुख्याने पाणी पुरवठा योजना, प्रमुख रस्ते, गावांना जोडणारे रस्ते, लहान मोठे पूल, ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप, रस्ते कॉंक्रिटीकरण, शाळा इमारत, क्रीडा संकुलन, प्रशासकीय इमारत आदी कामे मार्गी लावता आली, उर्वरित कामे प्रगतीत आहेत आज या भागातील वळणे गावचे ग्रामदैवताचे दर्शन व आशिर्वाद घेऊन गावभेट दौरा सुरु केला.
पुढे बोलताना ते म्हणाले फार कमी वेळात हा दौरा आयोजित केला आहे, लोकसभेच्या निवडणुकीत संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड मताधिक्याने आपण निवडून दिलं.
पवार साहेबांच्या स्वाभिमानावर घाला घालून आणि उध्दव साहेब ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांना देखील राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न झाला.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा दोन दिवसात होणे अपेक्षित.
उमेदवारीची घोषणा झाल्यावर, फॉर्म भरणे आणि प्रचार करणे यासाठी कमी कालावधी आहे.
काल राजगड (वेल्हे) तालुक्यातील मेंगाई देवीचा आशीर्वाद घेऊन गावभेट दौऱ्याला सुरुवात केली.
उद्याच्या येणाऱ्या २० तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे.
साधारण २७ दिवसच शिल्लक आहेत.
विकास कामे ही न संपणारी प्रक्रिया आहे. कामे कायमच चालू राहणार.
याभागात एस.टी.चा सेवा हा महत्वाचा विषय आहे. येथील एस. टी सुरळीत कशी सुरू राहील यासाठी विशेष लक्ष दिले आहे. ताईंनी सुध्दा वेळोवेळी सहकार्य केलं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा केल्याच्या नंतर मेळाव्याच्या रूपात आपल्यासमोर येऊ.
उद्याच्या २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत.
यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष महादेव आण्णा कोंढरे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सविताताई दगडे, मा.जिल्हा परिषद सदस्य आंनदा आखाडे, पंचायत समितीच्या मा.सभापती कोमलताई वशिवले, पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजीराव जांभुळकर, कार्याध्यक्ष सुरेश आण्णा पारखी, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला अध्यक्षा दिपालीताई कोकरे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निकिताताई सणस, कार्याध्यक्षा सविताताई गव्हारे, ज्योतीताई जोरी, भोर विधानसभा युवक काँग्रेसचे मा.अध्यक्ष राहुल जाधव, मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप साठे, सोशल मिडीया अध्यक्ष गोपाळ कदम यांच्यासह दिग्विजय हुलावळे, लक्ष्मण आप्पा ठोंबरे, अमोल गांधी तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ महिला व तरुण वर्ग उपस्थित होते