लोकं धनुष्यबाणालाच विजयी करतील:-पूर्वेश सरनाईक.

Maharashtra varta

 लोकं धनुष्यबाणालाच विजयी करतील:-पूर्वेश सरनाईक


नसरापूर (प्रतिनिधी):-संपादक न्यूज वार्ता नेटवर्क.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रसंगी  येथील वरवे ता.भोर येथे शिवसेना शिंदे गटाची कार्यकर्त्यांची बैठक  नुकतीच पार पडली. बैठकीचे आयोजन युवा सेनेच्या  भोर राजगड मुळशी यांचे वतीने वतीने करण्यात आले होते. 

या बैठकीला मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या बैठकीला युवासेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक ही देखील आवर्जून उपस्थित होते. सरनाईक यावेळी बोलताना म्हणाले, की,. लोकांनी याआधी जी चूक केली, ती २०२४ च्या निवडणुकीत केली जाणार नाही. लोकं धनुष्यबाणालाच विजयी करतील, असा विश्वास व्यक्त करीत त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचा सल्ला सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना दिला.


भोर तालुक्यातील वर्वे येथील शिवनेरी मंगल कार्यालयात शिवसेनेचा युवा सेना मेळावा शुक्रवार दि. १८ रोजी घेण्यात आला. या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य शिवसेना नेते मा. मंत्री विजय शिवतारे ,महाराष्ट्र युवा सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक,उपस्थित होते.

यावेळी कुलदीप कोंडे यांनी बोलताना सांगितले की,महाराष्ट्र मध्ये लाडक्या बहिणीच्या तोंडावर ज्यांचं नाव आहे ते भगवी तोफ,मुलुख मैदानी तोफ यांचा जे नाव आहे ते महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.अनेक कल्याणकारी योजना राज्यातील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी,गिरणी कामगारांसाठी अशा प्रत्येक घटकांसाठी त्यांनी योजना आणल्या आहेत. 

येथून पुढे 35 दिवसांमध्ये मतदार संघातील लोकांकडे पोहोचले पाहिजे. लोक मतदान करायला इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत ज्या सरकारने योजना आणल्यात आहेत त्याची पोचपावती घेऊन पोहोचले पाहिजे.म्हूणन शिवसेनेचा कणा आहे तो युवासेना आहे, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली तर निवडणूक महाराष्ट्र जिंकायला काही अवघड जाणार नाही.युवासेना कार्यकर्त्यांनी प्रचाराचे धुरा हातामध्ये घेतली तर निश्चितच ही निवडणूक जिंकली जाईल. भोर राजगड मुळशी मध्ये उमेदवार कुठला असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. उमेदवारी नाकारली तर नाराज न होता समजून जायचं की कदाचित आपण सर्वेमध्ये किंवा त्या निवडून येणे मध्ये कमी पडलो असेल तर निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी मिळणार आहे आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणायसाठी आपण थोड्यावरती आलो आहे. गेल्या वेळी आपल्याला 100000 मते धनुष्यबाणाला मिळाली. धनुष्यबाणापेक्षा समोरच्या उमेदवाराला 108000 मते त्यावेळी होती. म्हणजे त्यावेळी 4500 हजार मतांची गरज होती. आज आपली परिस्थिती चांगली आहे, समोरच्या उमेदवाराची परिस्थिती चांगली नाही. 

 

यावेळी मेळाव्याला  पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अमोल पांगारे ,मा. पंचायत समिती सदस्य, दशरथ जाधव तालुका अध्यक्ष भोर, निलेश घारे युवा सेना जिल्हाप्रमुख, सोमनाथ कुटे युवा सेना उपजिल्हाप्रमुख, दीपक करंजावणे मुळशी तालुकाप्रमुख, स्वप्निल सातपुते मुळशी युवा तालुकाप्रमुख, रेणुका रोकडे युवती सेना तालुकाप्रमुख मुळशी, किरण साळी सचिव युवा सेना, नितीन सोनवणे शहर प्रमुख भोर, गणेश निगडे उपजिल्हाप्रमुख, विकास बापू चव्हाण मा. सरपंच पेंजळवाडी, स्वप्निल गाडे तालुकाप्रमुख भोर, अमित गाडे, किशोर बारणे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज बंटी जगताप यांनी केले .

To Top