भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज ! ७० झोनल अफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती !

Maharashtra varta

 भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज ! ७० झोनल अफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती .


भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर वेल्हा राजगड आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण मिळून ४ लाख २१ हजार ५५४ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २ लाख २३ हजार ३५६ इतकी असून, महिला मतदार १ लाख ९८ हजार १९१ असल्याची माहिती भोर विधानसभा मतदार संघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विकास खरात आणि अप्पर तहसिलदार पूनम अहिरे यांनी दिली.



भोर विधानसभा मतदार संघाची निवडणूक पार पाडण्यासाठी

 ३ हजार कर्मचारी लागणार असून, राखीव ५०० कर्मचारी, ३५०० कर्मचारी आणि ७० झोनल ऑफिसरची आवश्यकता असणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच टप्यात निवडणूक होणार असल्याने २२ आँक्टोबर २०२४ ते २९ आँक्टोबर २०२४ सुट्टीचे दिवस वगळून अर्ज स्विकारले जातील. 

प्राप्त अर्जांची छाननी ३० अॅाक्टोबरला होईल तसेच चिन्ह वाटप त्याच दिवशी असणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.



मतदान केंद्रांची एकूण संख्या ५६४ इतकी असून, भोर २४०, वेल्हे ९६, मुळशी ३१८ केंद्र आहेत. तर १५०० पेक्षा अधिक मतदान असणारे एकही नाही. शहरी ५४ तर ग्रामीण ५०० मतदान केंद्र आहेत. सर्वात लहान बुरुडमाळ येथे ४० मतदार आहेत



उमेदवारांचे अर्ज भोर तहसिल कार्यालयातच घेतले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी नवसह्याद्री महाविद्यालयात दोन प्रशिक्षण घेतले जाणार आहे. इव्हीएमचे प्रशिक्षण आयटीआयला घेतले जाणार आहे. स्टाँगरुम आयटीआयला साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पानशेत, वेल्हे, भोर, मुळशी मतमोजणी आयटीआय भोर येथेच होणार आहे. राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. २४ तास ९ एसएसटी ९ फाईंग स्कॉड राहतील. तीन तालुक्यांत बीडीओ  झोनल ऑफिसर म्हणून असणार आहे. आचार संहिता प्रमुख नेमले आहेत. एक खिडकी योजनेतून अर्ज घेऊन परवानगी दिली जाणार आहे.


मतदार केंद्रावर बाथरुम रँम्प अपंगांना खुर्ची दिली जाणार आहे. प्रत्येक शाळेजवळ सावलीची सोय केली जाणार आहे. अधिक केंद्र असल्यास खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. टपाली मतपत्रिका सुविधा असणार आहे. पोलीस, होमगार्ड, एसटी बसचालक व मतदान कर्मचारी यांच्यासाठी पोस्टल मतदान सुविधा दिली जाणार आहे. ते मतदान केंद्रावरच मतदान करतील. 


मुळशी तालुक्यात सोसायटीमध्ये मतदान सुविधा करुन दिल्या आहेत. बावधन, हिंजवडी ५ सोसायटींसाठी ६ मतदान केंद्र केली आहे.



मतदानात वाढ व्हावी म्हणून सोसायटी मतदान केंद्र स्थापन केली आहेत. मतपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. १३ पुराव्यांपैकी एक पुरावा दिला, तरच मतदान करता येणार आहे. महिला मतदान कर्मचारी ज्या त्या मतदार संघात काम करतील.


अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ अॅाक्टोबर सकाळी ११ ते ३ या वेळेत राजकीय पक्षांना सुचक लागतो इतराना १० सुचक लागतात एकाला चार अर्ज भरता येतील राजकीय पक्षांनी ३ वाजेपर्यंत बी फार्म दिला पहिजे. तर आफिडेव्हिट शेवटच्या दिवसापर्यंत दयावे. १० हजार डिपाँझीज असून आधी भरावे लागणार आहे. शपथ पत्र ५०० रु दयावे. खर्चाचा तपशील दयावा लागेल. मर्यादा ४० लाख रु आहे. अर्ज २२ पासुन विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरायला मदत करणार आँनलाईन अर्ज निवडणुक आयोगाने दिलेल्या अँपवर भरावा आणी प्रिंट काढुन निवडणूक अधिकारी यांच्याकडे २९ ला ३ वाजेपर्यंत जमा करावे.

To Top