राजापूर गावात विविध विकास कामाचे उद्घाटन.जवळपास 76 लाखांचे भुमीपुजन.
भोर (प्रतिनिधी)-पत्रकार विठ्ठल पवार.
महायुतीच्या माध्यमातून राजापूर गावात विविध विकास कामांचे उद्घाटन.जवळपास 76 लाखांचे भुमीपुजन. लवकरच लक्ष्मीआई माता मंदिराचचे कामास सुरुवात समाजमंदिर काम प्रस्तावित
भोर तालुक्यातील महायुतीचे नेते पुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतारे,मा.पुणे जिल्हा परिषद चे सदस्य चंद्रकांत बाठे,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप,भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष संतोष घोरपडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश निगडे,भोंगवली गावचे मा.संरपंच मनोज निगडे,यावेळी महायुतीचे भोंगवली गणाचे शिवसेनेचे युवा नेते हर्षद बोबडे यावेळी बोलताना रणजीत शिवतारे म्हणाले की आमची कालच महायुतीची बैठक संपन्न झाली.आम्ही महायुती जो कोणी उमेदवार देईल त्यांचे प्रमाणित काम करू.तसेच लाडकी बहीण योजणेचे पैसे महायुतीने चालू केले.आणि पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास ही योजना अशीच सुरू ठेवू.आणि योजनेचे दुप्पट पैसे महिलांच्या खात्यात मिळतील असे अजितदादा पवार यांनी जाहीर केले आहे.राजगड सहकारी कारखाना नुसता सुरू करू अशीच आश्वासने दिली गेली.आणि आत्ता पण तेच सांगतात.पण गेल्या वर्षी पण सुरू झाला नाही आणि ह्या वर्षी पण सुरू होतो की नाही श्वास्वती नाही.एव्हढेच काय सोमेश्वर कारखाना 3700 रू दर देतो आजपर्यंत राजगड कारखान्याने असा दर दिल्याचे निदर्शनास आले नाही.सारोळा ते गुणंद पर्यंत अजित पवार यांनी पुनर्वसन मधुन 6.64 लाख रूपयांचे विकास कामे मंजुर केली आहेत.लाईटीचा असणारा लपंडाव लवकरच केंजळ येथील सपटेशन झाले की सुळलीत होईल.काहींनी पेंजळवाडी न्हावी येतील होणारे सपटेशनला विरोध केला.पुढे भालचंद्र जगताप म्हणाले विकास कामे होऊ द्या आणि कामे करणारांना प्राधान्य द्या.जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्यांचा जोरदार प्रचार करा.विधानसभेला परिवर्तन हे झालेच पाहिजे. पुढे भोंगवली गणाचे शिवसेनेचे युवा नेते हर्षद बोबडे यांनी गावातील विकासकामे ही झाली पाहिजे ते कोणाच्याही माध्यमातून होऊद्या.एव्हढी मोठी विकास कामे मंजुर केली त्याबद्दल भोर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले आणि राजापुर तसे पुर्व भागावर असणारे प्रेम आपण असेच ठेवावे असे व्यक्त केले.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भोर राजगड मुळशी तालुक्यात विकास कामे आजुन जोरदार पणे महायुतीचा उमेदवार विधानसभेवर असेल तर होईल.अशी अपेक्षा महायुती च्या नेते मंडळींनी व्यक्त केली. तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी राजापुर गावचे विद्यमान सरपंच बाळासाहेब बोबडे,आणि तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बागल,मा.संरपंच रामभाऊ बोबडे,श्रीरंग खुटवड,मा.चेअरमन मोहनराव मोरे,मा.उपसंरपंच चंद्रकांत बोबडे, बाळासाहेब खुटवड, जेष्ठ नागरिक सर्जेराव दादा बोबडे, आत्माराम आबा बोबडे,दिलीपदादा बोबडे, दत्तात्रय बागल,रमेश बोबडे, प्रकाश बोबडे,भगवान भरगुडे, राजेंद्र मोरे, ,महिला वर्ग तसेच तरूण वर्ग इत्यादींच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.आभार दिलीपनाना बोबडे यांनी मांडले.