बेताल वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचा भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध.
भोर मध्ये तणावाचे वातावरण
कापूरहोळ (प्रतिनिधी):-
माजी मंत्री व लोकनेते अनंतराव थोपटे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा जाहीर निषेध दि.7ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको व जोडे मारो आंदोलन पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ चौकात करत भोर, राजगड ,मुळशी तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त
करण्यात आला
पुण्याचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे काल दि.6ऑक्टोबर रोजी भोर येथे दिवाळी कीट वाटप करण्याच्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने भाषणात आमदार संग्राम थोपटे यांच्यासह काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्याविषयी अपशब्द वापरले. यामुळे भोर तालुक्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले .काल रात्री काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भोर पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार देऊन ठिय्या आंदोलन केले व संबंधितांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
■जाहिरात■
माजी मंत्री व लोकनेते अनंतराव थोपटे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने भोर शहरांत सुद्धा तणावाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे, भोर शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पायी मोर्चा काढत संबंधिताचा निषेध यावेळेस करण्यात आला.
भोर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखत व रास्ता रोको करत घोषणा देत निषेध नोंदवला. जोपर्यंत संबंधिताला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको करतच राहु, त्यामुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळाले, परंतु राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी याबाबत तातडीने कारवाई करू असे सांगितल्यावर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले .
(रास्ता रोको करत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याप्रसंगी या आशयाचे मनोगत व्यक्त केले, मनोगतात असे म्हटले की, भोर, राजगड , मुळशीचे आमदार अनंतरावजी थोपटे यांनी आपला पूर्ण वेळ ग्रामीण भागातील गावच्या विकासासाठी दिला आहे, हे तुम्हा आम्हा सर्वांस ठाऊक आहेच. सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लोकप्रिय असे अनंतराव थोपटे यांच्याबद्दल जे कोणी अपशब्द बोलेले तर इथला स्वाभिमानी मावळा खपवून घेणार नाही ,कदाचित गायकवाड यांना आपल्या वयाची कल्पना नसेल आणि भावी आमदार म्हणून स्वप्न पाहणाऱ्याना त्यांचं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहील आणि पुन्हा कोणीही याबाबत अपशब्द वापरल्यास भोर, राजगड, मुळशी ची जनता त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही.)
याप्रसंगी भोर राजगड मुळशी मधील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.