गावच्या विकासकामात राजकारण नको ..रणजीत शिवतरे किकवी पंचक्रोशीत ४.४० कोटीचा निधी

Maharashtra varta

 गावच्या विकासकामात राजकारण नको ..रणजीत शिवतरे


किकवी पंचक्रोशीत ४.४० कोटीचा निधी



 नसरापूर (प्रतिनिधी) :

-कारभारी बदला तरच त्याला कामाची जाण राहते. एकाच माणसाला ठेवल की निष्कामी होऊन बसतो. आम्ही गावात गटातटाचे राजकारण न करता कायम विकासाची भुमिका घेऊन कामे करतो. शासनाच्या योजना आपल्या भागात कश्या राबवता येतील यावर आमचा लक्ष असते. गावच्या विकासकामात राजकारण नको असे माजी जि.प. उपाध्याक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितले .

       किकवी (ता.भोर) पचक्रोशीतील दि.४ रोजी मोरवाडी १ कोटी २५ लाखांची ,वागजवाडी १२ लाखांची, काळेवाडी ३५ लाखांची , किकवी १ कोटी १७ लाखांची ,तर धांगवडी १कोटी ५ लाख रूपयांची आशी ४कोटी ४० लाखांची विकासकामे माजी जि.प. उपाध्याक्ष रणजित शिवतरे व माजी जि.प. सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या विशेष प्रयत्नातून झाली. त्यावेळी भूमिपुजन व उद्घाटन माजी जि.प.उपाध्याक्ष रणजित शिवतरे हस्ते करण्यात आले. त्यावेळी माजी जि.प. सदस्य रणजित शिवतरे बोलत होते.

         त्यावेळी पी.डी.सी.सी बँकचे संचालक भालचंद्र जगताप ,राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष घोरपडे , माजी उपसभापती विक्रम खुटवड , जिल्हा राष्ट्रवादी सचिव प्रकाश तनपुरे ,राजेंद्र सोनवणे , किकवी सरपंच नवनाथ कदम , उपसरपंच वंदना आहिरे,मोरवाडी सरपंच ज्योती मोरे ,उपसरपंच संतोष मोरे , वागजवाडी सरपंच निकिता आवाळे , रामकृष्ण मोरे , गणेश आवाळे ,केंजळ सरपंच कविता बाठे , धांगवडी सरपंच सचिन तनपुरे ,अंकुश जाधव , जर्नादन काळे , अर्जुन आहिरे , कामगार नेते नारायण भिलारे , अनिल तनपुरे उपस्थित होते.

         त्यावेळी बोलताना माजी जि.प.सदस्य चंद्रकांत बाठै म्हणाले , सार्वजनिक हिताची भुमिका ठेवली तर गावाचा विकास झालाशिवाय राहत नाही. गटातटाच्या राजकारण गावाच्या विकासाला खो घालतो. गावाच्या विकासांसाठी सगळ्यांनी एक आल पाहिजे. 


फोटो - किकवी येथील उदघाटन करताना माजी जि.प. उपाध्याक्ष रणजित शिवतरे , चंद्रकांत बाठे , विक्रम खुटवड , भालचंद्र जगताप

To Top