राजगड (वेल्हा) - जल्लोष, उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादात होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न!

Maharashtra varta

  राजगड (वेल्हा) - जल्लोष, उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादात होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न!




राजगड (प्रतिनिधी):-

राजगड तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये कादवे तालुका राजगड येथील मोनिका तेलावडे ह्या होम मिनिस्टर ठरल्या आणि त्यांना ज्युपिटर टू व्हीलर हे बक्षीस देऊन त्यांचा उचित गौरव याप्रसंगी करण्यात आला.


अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट, भोर-राजगड (वेल्हा)- मुळशी आयोजित राजगड (वेल्हा) तालुकास्तरीय गौरी  दि.6ऑक्टोबर 2024 रोजी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण व होम मिनिस्टर कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास 4973 महिला उपस्थित होत्या, या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून विजेत्यांना बक्षिसांचे  वितरण आणि उपस्थित तमाम महिला भगिनींना भोर राजगड मुळशीचे आमदार संग्राम थोपटे  संबोधित केलं ते पुढे म्हणाले की,नेहमी कुटुंबासाठी कष्ट घेणाऱ्या महिलांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोडीशी उसंत आणि ऊर्जा मिळाल्याचं सुख त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसलं. याप्रसंगी कार्यक्रमाचं सुंदर आणि देखणं नियोजन केल्याबद्दल अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टचे आभार व्यक्त केले. महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि मनोरंजनाचा आनंद घेतला 

याप्रसंगी अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. स्वरूपाताई थोपटे आमदार संग्राम थोपटे, राजगड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष रेणुसे प्रदीप मरळ पुणे जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दुर्गा चोरगे ,महिला अध्यक्ष आशाताई रेणुसे ,पुणे जिल्हा परिषदेचे मा. सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे ,वसुधा नलावडे ,मा. सभापती सविता वाडघरे, सीमाताई राऊत, मा. पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले राजगड तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष आकाश वाडघरे ,मा.सदस्य गणपतराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष छायाताई काळे ,राजगड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज बापू शेंडकर उपाध्यक्ष गणेश जागडे शिवाजीराव चोरगे विशाल वालगुडे ,अमोल अण्णा पडवळ, निलेश पवार, संतोष लिमन,संभाजी खुटवड  याप्रसंगी राजगड तालुका महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला भगिनी  विविध गावचे आजी माजी सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




To Top