भोर व पुरंदरची या दोन जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार ?

Maharashtra varta

 भोर व पुरंदरची या दोन जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार ?



मुंबई( प्रतिनिधी):- संपादक स्पेशल रिपोर्ट.

पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा आणि पुरंदर  विधानसभा मतदारसंघाचे या 2 जागेवर  शिवसेना (शिंदे गट) निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. असे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

पुणे शहरातील असणाऱ्या मतदार संघावरती यापूर्वी शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट)  दावा केला होता, मात्र आता शिंदे गटाने पुणे शहरातील असणाऱ्या मतदार संघावरचा दावा सोडला असून पुणे जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघात जागा  मिळणार असल्याची माहिती  विश्वसनीय सूत्रांकडून  मिळत आहे.

 पुण्यातील विधानसभा लढण्याचा दावा शिवसेनेने (Shiv Sena) सोडला आहे. पुणे शहरातील एकाही जागेवर एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) शिवसेना उमेदवार देणार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर पुणे जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर या जागेवर शिंदेसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

To Top