कथीत प्रशासनिक Whatsup...????
भोर( प्रतिनिधी):-संपादक न्यूज वार्ता नेटवर्क●
वेळ ठरली. सकाळी 11.00 वा. दिनांक : 18 सप्टेंबर 2024 उद्या सकाळी बरोबर 11.00 वा. भोर तालुक्यातील सर्व शिक्षक केंद्र, बीट, पंचायत समिती, DIET सह अन्य सर्व तथाकथित प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुप मधून लेफ्ट होतील. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा भोर तालुका अध्यक्ष सुनिल लेकावळे यांनी दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की,मोबाईल ही आपली खाजगी मालमत्ता असून त्यावरील आदेश पाळणे आपल्याला बंधनकारक नाही. त्याचप्रमाणे प्रशासनिक कामासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करून माहितीचे व्हाट्सअप ग्रुप वरून आदान-प्रदान करण्याचे कोणतीही शासन निर्णय नाही. आपल्या सर्वांचे मानसिक स्वास्थ्य खराब करणाऱ्या रात्री-अपरात्री, कोणताही काळ वेळ साप्ताहिक सुट्टी दीर्घ सुट्टी न पाहता वाटेल तेव्हा व्हाट्सअप वरून मेसेज, लिंक टाकून यंत्रणा मोकळी होते व आपले मन:स्वास्थ्य खराब करत तात्काळ माहिती मागते. त्यामुळे आपण सारेच त्रस्त आहोत.बिनधास्त सगळे लेफ्ट व्हा...- या संबंधाने कुणीही कोणतीच कारवाई करू शकत नाही; कारण कोणताही व्हाट्सअप ग्रुप बनवायचा कोणताही कायदा, नियम व शासन निर्णय आजपर्यंत अस्तित्वातच नाही.
तथाकथित प्रशासनिक WhatsApp Group वरून बाहेर पडल्यानंतर पर्यवेक्षकीय यंत्रणेतील आणि संस्थांतील काही अतिउत्साही मान्यवर महोदय (मुख्याध्यापक-शिक्षकांना) वैयक्तिक मेसेज टाकून माहिती मागण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील याची जाणीव आहे. मात्र कुणीही विचलित न होता अशा प्रकारे वैयक्तिक मेसेज प्रशासनिक कामासाठी, माहितीसाठी WhatsApp वरून पाठवल्यास त्याला कोणताही प्रतिसाद न देता मोबाईल मध्ये WhatsApp Setting मध्ये असणाऱ्या सुविधेचा वापर करून आवश्यक तो बंदोबस्त करावा. किंवा अशा प्रकारे व्हाट्सअप च्या माध्यमातून वैयक्तिक मेसेज टाकून त्रस्त करणाऱ्या पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या संबंधिताचा पुढील काही काळासाठी WhatsApp Number ब्लॉक करणे अधिक चांगले राहील.भयमुक्त व्हा... चुकीच्या धोरणास विरोध करा...!सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती - महाराष्ट्र राज्य

