मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष चंदुभैय्या परदेशी यांचा जन्मदिवस लेख
नवपर्वाची आस असणाऱ्या .. उद्योगक्षेत्रात नाविन्याचा ध्यास ठेवणारे
...........आणि ......
......'उद्योगाची पारख...
....हीच चंदुभैय्या परदेशी यांचीओळख"
मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती चंदुभैय्या परदेशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.
चंदू भैया परदेशी हे एक प्रसिद्ध समाजसेवक आहेत. ते केळवडे ता.भोर येथे जन्मले. त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यांनी 20 वर्षापासून समाजसेवा करण्यास सुरुवात केली. त्यांनी 'मैत्री प्रतिष्ठान' ही सोशल फाउंडेशन स्थापन केल. या माध्यमातून ते गरीब शेतकऱ्यांना उत्तम बीज आणि खत उपलब्ध करून देतात, शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करतात आणि पर्यावरणासाठी काम करतात.
चंदू भैया परदेशी हे एक आदर्श समाजसेवक आहेत. त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आज आपला लाडका चंदू भैया परदेशी यांचा जन्मदिवस आहे. मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असलेले भैया आपल्या अनेकविध कार्यांमुळे ओळखले जातात. त्यांचे जीवन हे सेवाभाव आणि समाजकारणाचे एक उत्तम उदाहरण आहे.भैयांचे कार्यक्षेत्र फार विस्तृत आहे. वृक्षारोपण, गोरगरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गोरगरिबांच्या आजारांवर औषध उपचार, वैद्यकीय बिल माफ करण्यासाठीचे प्रयत्न, मित्रपरिवाराच्या सुखदुःखात सहभागी होणे, खेडशिवापूर टोल नाक्याबाबत आंदोलन करणे, पुणे-सातारा महामार्गावरील रस्त्यांच्या खड्ड्यांच्या समस्या सोडवणे, समाज सक्रिय भूमिका घेणे असे अनेक क्षेत्रात त्यांनी आपले योगदान दिले आहे. भैयांचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे त्यांचा मित्रपरिवार. त्यांच्या या मित्रपरिवारानेच त्यांना त्यांच्या कार्यात प्रेरणा दिली आहे. भैयांचे कार्य हे केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण समाजाचे आहे.अविरत यत्न जयांची त्यांना साद देती यशशिखरे. या उक्तीप्रमाणे उदयोग ,सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे भोर तालुक्यातील,कृषिभूषण,ऐतिहासिक,सांस्कृतिक ओळख असणाऱ्या केळवडे ता. एक धुरंधर व उद्यमशील कर्तृत्ववान माणूस म्हणजे चंदुभैय्या परदेशी उदयोग व्यवसायात चिकाटी परिश्रमाच्या जोरावर चंदुभैय्या परदेशी यांनी आपलं नाव कमावलं .पुणे जिल्ह्यात चंदुभैय्या परदेशी एक चांगला प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखल जात.याचबरोबर भोर तालुक्यातील एक चांगला सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या या व्यक्तीला समाजकार्यासाठी निमित्त शोधावं लागल नाही.. लोकांच्या सुखदुःखात तात्या समरस होतात. त्यांची दुःख समजावून घेऊन त्यांना मदत करतात.आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे कमीत कमी वेळात आकलन करून समस्येवरची उत्तर शोधणारी स्वयंभू प्रतिभेची माणस विरळीच असतात. आई वडिलांनी घालून दिलेले आदर्श संस्काराच्या शिदोरीवर हे कुटुंब वाटचाल करत आहेत. आपल्याला चांगलं करता येत असेल तर नक्की करावे मात्र आपल्या चुकीच्या विचाराने व कृतीने समाजमनावर ओरखडा ओढला जाणार नाही ना याची काळजी ते पदोपदी घेऊन समाजात एक चांगल काम उभे करत आहे. असे सामाजिक व उद्योगविश्वात प्रगल्भता जपणाऱ्या चंदुभैय्या परदेशी यांचा आज 18 सप्टेंबर 2024ला वाढदिवस संपन्न होतोय.
" इंसानियत दिल में होती है, हैसियत में नही,
उपरवाला कर्म देखता है, वसीयत नही.. अशा प्रकारे उत्तम काम करणारे "चंदुभैय्या परदेशी"
..कर्तृत्वाची वेल, एवढी बहरलेली..... जीवनाची प्रत्येक फांदी, अजून तेवढीच मोहरलेली "आपलं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलनार .... प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस एक नवं क्षितिज शोधणार ...........अशा उत्साही पद्धतीने 'समाज' व " व उद्योगकारणात, कमी वेळेत जास्तीत जास्त "लोका- उदयोगभिमुख कार्य" करून हृदय सिंहासनावर आरूढ होऊन करीत असलेल्या कार्यास व या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा. अभिष्टचिंतनदिवसाच्या निमित्ताने... आई तुळजाभवानीच्या कृपेने वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश,आपलं ज्ञान आणि आणि उद्योगक्षेत्रातील स्थान कायम उंचावत राहावे.
सर्वांच्या लाडक्या तरुण तडफदार विनयशील वैभवशाली व्यक्तिमत्व लाभलेले
चंदुभैय्या परदेशी यांचा जन्मदिवस
साजरा होत असताना त्यांच्या दमदार वाटचालीचा अनुभव आपल्या सर्वाना आल्या वाचून राहत नाही.
अशा ध्येयनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ,उद्यमशील व्यक्तीमत्व लाभलेले आणि ,समाजहितेशी व योग्य समाजकारण विलक्षण वेड असणाऱ्या ऐतिहासिक शिवरायांच्या मावळयाला भावी काळात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात , उद्योग व सामाजिक वाटचालीत यशाची शिखरे गाठण्यासाठी आई जगदंबा उदंड शक्ती व सामर्थ्य देवो हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने समस्त भोर, राजगड, हवेलीकर यांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा.🔶🔶🔶⚛⚛⚛🌈⚛⚛
शुभेच्छुक:श्री. विठ्ठल पवार
प्रसिद्ध निवेदक व पत्रकार
मोबाईल नं.📞.९२२६८००७८३

