शिक्षक प्रशासकीय व्हाटसप ग्रुप मधून बाहेर पडणार ..
पुणे (प्रतिनिधी):-टी पवार.
महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक 18 सप्टेंबर 2024 रोजी प्रशासकीय ग्रुप मधून बाहेर पडणार असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी पुणे या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नुकतीच दिली आहे.
महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी विद्यार्थी हितासाठी व राज्यातील शिक्षक बंधू-भगिनींनी केलेल्या मागणीनुसार वरील निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार बुधवार दिनांक - १८/९/२०२४ रोजी सर्वांनी प्रशासकीय व्हॉट्सअॅप ग्रुप मधून बाहेर व्हावे . कोणीही ग्रुपमध्ये थांबू नये व २५/९/२०२४ रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी सर्वांनी करावी. अभी नहीं तो कभी नहीं !असे सांगण्यात आले आहे.

