भोर विधानसभा मतदार संघात दिव्यांगांचे सर्वात मोठे संकुल उभे करणार:-बाळासाहेब चांदेरे.
भोर येथे दिव्यांगांचा महामेळावा संपन्न.
भोर ( प्रतिनिधी):- टी. पवार.
भोर ,राजगड मुळशी या तीन तालुक्यासाठी तालुक्यातील दिव्यांग बांधव भगिनींसाठी स्वतंत्रपणे तिन्ही तालुक्यात दिव्यांग संकुल उभे करून त्यामध्ये दिव्यांगांसाठी करियर मार्गदर्शन तसेच शैक्षणिक सोयीसुविधा, वस्तीगृह,करिअर गाईडन्स अशा विविध प्रकारच्या सुविधा या संकुलातून दिव्यांग बांधव भगिनींसाठी निर्माण करून आगामी काळात मोठे काम केले जाणार असून प्रत्येक तालुक्यात दिव्यांग बांधवांसाठी भोरमध्ये दोन एकर राजगड तालुक्यात दोन एकर तसेच मुळशी तालुक्यात दोन एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी दिव्यांगांसाठी दिव्यांग संकुल उभे करणार असून आगामी काळात दिव्यांगांच्या सर्व विकासासाठी मी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी केले.
भोर येथे भोर, राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यातील चार हजार पाचशे दिव्यांग बांधव भगिनींचा मेळावा संपन्न झाला, त्या मेळाव्यात बाळासाहेब चांदरे बोलत होते, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे तसेच दिव्यांगांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी दिव्यांग बांधव भगिनींच्या पाठीमागे हा भाऊ म्हणून बाळासाहेब चांदेरे कायम उभा आहे. याप्रसंगी दिव्यांग दिव्यांगांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते, जवळ जवळ 50 जणांना या लकी ड्रॉच्या माध्यमातून मोठ्या बक्षीस वस्तू देण्यात आल्या तसेच सहभागी असलेल्या सर्व दिव्यांगांना आकर्षक भेटवस्तू याप्रसंगी देण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील यांचे शिवव्याख्यान झाले.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीचे अध्यक्ष कांताताई पांढरे, पुणे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश निगडे ,भोर तालुका शिवसेनेचे अध्यक्ष दशरथ जाधव, भोर विधानसभा शिवसेनेचे नेते गणेश मसुरकर, भोर तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले, राजगड तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष नामदेव वालगुडे, मुळशी तालुका अपंग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भेगडे महेंद्र सोनवणे ,किरण रांजणे,शिवाजी कडू,महेंद्र सोनवणे,भानुदास दुधाने, दत्ता दाभाडे, मनीषा गायकवाड, वनिता महाडिक ,सुरेश भेगडे ,बाजीराव पारगे, निलेश जागडे ,प्रवीण भरम सातारा जिल्हा अपंग क्रांती संघटनेच्या अध्यक्षा शबीना शेख व भोर राजगड मुळशी तालुक्यातील पदाधिकारी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

