आपलं सरकार आणा ,जुनी पेन्शन योजना मान्य करतो. उद्धव ठाकरेंचे सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन.
शिर्डी (प्रतिनिधी):-पत्रकार पवार सर.
आपलं सरकार आणा ,जुनी पेन्शन योजना मान्य करतो. उद्धव ठाकरेंनी सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन केले. विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी प्रचाराला आता प्रचंड वेग आला आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यभरातल्या सभा मेळावे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत ,याच याच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्ष विविध घोषणा आश्वासन देत आहे , राज्याचे मा. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे देखील मराठवाड्यावर आहेत,आज रविवारी जुनी पेन्शन योजनेच्या महा अधिवेशनात कर्मचाऱ्यांना संबोधित करताना आंदोलकांशी त्यांनी संवाद साधला बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ,आमचे सरकार आणा तुम्हाला जुनी पेन्शन योजना आणतो असे आश्वासन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळेस देण्यात आले, जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या महाधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी स्वतः हजेरी लावली आपलं सरकार आणा मी तुमची मागणी मान्य करतो सत्ता येथे जाते सत्ता येणार गेलेली सत्ता मी खेचून आणणार मी तुम्हाला न्याय देतो असं अभिवचन उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिले.


