भोर तालुक्यातील चिखलगाव येथील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश!
भोर (प्रतिनिधी)
भोर राजगड (वेल्हा) मुळशीचे कार्यसम्राट आमदार *मा.श्री. संग्रामदादा थोपटे* यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन व त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा धडाका पाहून भोर तालुक्यातील *मौजे चिखलगाव* येथील *अर्जुन दिघे* यांची भोर तालुका काँग्रेसच्या *उपाध्यक्षपदी* निवड करण्यात आली. तसेच *रोहिदास धोंडे, बाळासाहेब धोंडे, प्रदीप धोंडे, शांताराम धोंडे, प्रमोद धोंडे, रामदास धोंडे, विजय धोंडे, आप्पाजी धोंडे, आनंदा निगडेकर यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन करून पक्षात स्वागत केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी भोर पंचायत समितीचे मा.सभापती *बाळासाहेब थोपटे,* यांच्यासह *पांडुरंग धोंडे, राजाराम धोंडे, शंकरनाना धोंडे, रघुनाथआप्पा धोंडे, राजेंद्र शेटे, प्रमोद थोपटे, संतोष केळकर, शिवाजी सासवडे, शिवाजी सणस, पर्वती धोंडे* आदी उपस्थित होते.

