कविताताई खोपडे यांचे सामाजिक कार्याच्या जिद्दीला सलाम :-डॉ. मधुकर जगताप.
भोर येथे महाआरोग्य शिबिर संपन्न.
भोर ( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कविताताई खोपडे यांनी भोर तालुक्यातील शेकडो नागरिक- महिलांना आरोग्य सेवा सुविधेचा लाभ देऊन मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. वेळप्रसंगी रुग्णांबरोबर येऊन हॉस्पिटलशी चर्चा करून मदत देखील केलेली आहे .कोणताही राजकीय स्वार्थ किंवा राजकीय प्रसिद्धी पाहिजे असा स्वार्थ मनामध्ये न ठेवता केवळ समाजासाठी काम करायचं ,आपण या मातीशी बांधिलकी जपण्याची मनामध्ये जिद्द ठेवत सातत्याने त्या सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यांच्या जिद्दीला सलाम करून त्यांच्या त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो असे प्रतिपादन श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजचे सीनियर सुप्रीडेंट डॉ.मधुकर जगताप यांनी केले.
विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, भोर तालुक्यातील 200 स्त्री -पुरुष नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला ,यामध्ये नेत्ररोग तज्ञ ,दंतरोग तज्ञ ,अस्थिरोग तज्ञ ,हृदयरोग ,स्त्री रोग ,बालरोग तज्ञ, सर्जन तपासणीत चाचणी औषध उपचार आणि शस्त्रक्रिया हे होते.
या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटलचे असिस्टंट सुप्रीडेंट डॉ. मधुकर जगताप, उपजिल्हा रुग्णालय भोरचे वैद्यकीय अधीक्षक पांडुरंग दोडके, गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्य रेखाताई पाटील, राजमाता बचत गटाचे अध्यक्षा सौ. रुपाली नवघणे, भारत सरकार नोटरी ऍडवोकेट सुवर्णा बदक, राजकुमार काळे, नितीन झुंजरकर, सोम्यता बोरा, कृष्णा बिटला, डॉ .गजानन घुले, डॉ भागेश्वर नकादे, डॉ सुदर्शन गुहादे, सुनील ढगे, आकाश फड, अजय पोटे, ईशान साने , विविध डॉक्टर्स भोर तालुक्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
उपस्थितांचे स्वागत संग्राम खलाटे यांनी केले , तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कविताताई खोपडे, तर आभार प्रियंका खोपडे यांनी मानले.
(प्रास्ताविकामध्ये बोलताना जिद्द फाउंडेशनचे अध्यक्षा कविताताई खोपडे म्हणाल्या की, मी या समाजाची आहे व समाज माझ्यासाठी आहे, या ध्येयाने या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे तरी या मातीतल्या माणसांसाठी मी सामाजिक विकासासाठी काम करत असून गोरगरिबांची सेवा मला करता यावी यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन शैक्षणिक, सहकार,, कृषी क्रीडा वैद्यकीय काम करू या.)




