नांदगाव येथे प्रज्ञाशोध परीक्षा कार्यशाळा संपन्न.

Maharashtra varta

 नांदगाव येथे प्रज्ञाशोध परीक्षा कार्यशाळा संपन्न.


भोर (प्रतिनिधी):-

पुणे जिल्हा परिषद पुणे , डायट पुणे , व पंचायत समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमाने  सन  2024 - 25 या शैक्षणिक वर्षातील प्रज्ञाशोध परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव ,तालुका भोर येथे इयत्ता ४ थी व  इयत्ता  ७ वीच्या शिक्षकांसाठी अंबवडे बीटस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा कार्यशाळेचे आयोजन केले होते.

 भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रमेश शेटे सर,. कार्यशाळा  समन्वयक  विशेष शिक्षिका सुरेखा राजीवडे उपस्थित होत्या

प्रज्ञाशोध परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय ?परीक्षा किती गुणांची आहे ? परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप ,प्रकार, प्रज्ञाशोध परीक्षेतील सराव परीक्षा इत्यादीबाबत कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन केले .या कार्यशाळेत 45 शिक्षक सहभागी झाले. यावेळी श्रीधर गव्हाणे भाषा ,गणित सुरज खोब्रागडे बुद्धिमत्ता, महेंद्र खोमणे इंग्रजी या तज्ञ प्रशिक्षकांनी   मार्गदर्शन केले.

To Top