शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद, पुणे
पुणे (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर
गुणवंत शिक्षक, केंद्रप्रमुख व अध्यक्ष चषक पुरस्कार सन २०२३-२०२४ निवड प्रक्रिया दिनांक ३१.०८.२०२४ स्थळ- जिल्हा परिषद, पुणे यांनी प्रेसनोट मध्ये नमूद असे केले आहे की,
गुणवंत शिक्षक, केंद्रप्रमुख व अध्यक्ष चषक पुरस्कार सन २०२३-२०२४ निवडीसाठी जिल्हास्तरावर दिनांक ३१.०८.२०२४ रोजी मुलाखत व सादरीकरण घेण्यात आले. यामध्ये जिल्हास्तरावरुन नियुक्त केलेल्या तपासणी समितीने १३ तालुक्यातुन ऑनलाईन नोंदणी केलेल्या १३२ शिक्षक, ७ केंद्र प्रमुख तसेच अध्यक्ष चषकसाठी प्राथमिक शाळा २८ व उच्च प्राथमिक २२ शाळांची जिल्हास्तरावरुन नियुक्त केलेल्या अधिका-याकडून तपासणी करुन मुलाखत व सादरीकरणासाठी एकुण ४३ शिक्षकांची, ०५ केंद्रप्रमुख तसेच प्राथमिक ०६ शाळा व उच्च प्राथमिक ०६ शाळा अशा एकुण १२ शाळांची अध्यक्ष चषक पुरस्कार निवडीसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांची मुलाखत व सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या ०५ सदस्यीय निवड समिती यामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथ.), शिक्षणाधिकारी (माध्य.), प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे व दोन बहिस्थ संस्थेचे शिक्षण तज्ञ यांचा समावेश होता. सदर गठित समितीसमोर उपरोक्त नमुद सर्वांची मुलाखत व सादरीकरण घेण्यात आले.
जिल्हास्तर गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी १३ तालुक्यातून प्रथम व उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी एकुण २७ शिक्षक, ३ केंद्रप्रमुख व अध्यक्ष चषक पुरस्कारासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारासाठी प्रत्येकी ५ शाळांची निवड करण्यात आली आहे. (निवड यादी सोबत जोडली आहे.) या सर्वांचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जिल्हा परिषद, पुणे यांनी अभिनंदन केले. सदर पुरस्कारर्थीना जिल्हास्तरावर घेण्यात येणा-या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.
खालील गुगल ड्राईव्ह कॉपी करून आलेली ड्राइव्ह लिंक वर क्लिक करून पुणे जिल्हा परिषदने केलेल आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची नावे व पुणे अध्यक्ष जिल्हा चषक पुरस्कारासाठीच्या शाळा
https://drive.google.com/file/d/1-mm61ZYTBaNH2VryO7LAdwmMHvG55xM0/view?usp=drivesdk
https://drive.google.com/file/d/1-mm61ZYTBaNH2VryO7LAdwmMHvG55xM0/view?usp=drivesdk

