पुणे जिल्हा परिषद पुणे चा आदर्श शिक्षक पुरस्कार विजय बिरामणे यांना जाहीर
पुणे जिल्हा परिषद पुणे चा आदर्श शिक्षक पुरस्कार हातवे खुर्द शाळेतील विजय बिरामणे यांना जाहीर झाला.
नेकी व्यर्थ नही जाती, हरी लेखा जोखा रखते है.याऔरो को फुल दिये जिसने उसके भी हात मेहकते है'.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातवे खुर्द साठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस. आज पुणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा गुणवंत पुरस्कारासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि बिऱ्हामणे परिवाराचा स्वाभिमान विजय आप्पाजी बिऱ्हामणे' यांची सार्थ निवड झाली.
विजय सरांचा हातवे खुर्द शाळेतील सुरु झालेला प्रवास आज खऱ्या अर्थाने यशो शिखरावर पोहचला.
हातवे ग्रामस्थ यांच्या सहकार्याच्या आणि विजय सरांच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर हातवे खुर्द शाळेने जो नावलौकिक मिळवला आहे ,त्यामध्ये या पुरस्काराने आणखी भर टाकली. हातवे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने विजय सरांचा भव्य जाहीर नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात असले ही माहिती सरपंच व ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आजचा हा पुरस्कार हा नि:स्वार्थी सेवाभावाने काम करणाऱ्या त्या प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायी ठरेल.विजय सर आणि आम्हा दोघा बिऱ्हामणे बंधूंच्या सदैव पाठीशी असणाऱ्या हातवे खुर्द ग्रामस्थ यांचंही मनःपूर्वक अभिनंदन..... 🙏🙏🙏🙏कर भला सो हो भला.
.jpg)
