खानापूर शाळेस नॅशनल ऍग्रो फाउंडेशन च्या वतीने संगणक संच भेट

Maharashtra varta

 खानापूर शाळेस नॅशनल ऍग्रो फाउंडेशन च्या वतीने संगणक संच भेट 


भोर( प्रतिनिधी):- पत्रकार विठ्ठल पवार

भोर राजगड तालुक्यात शैक्षणिक सामाजिक कृषी क्रीडा आदी विविध क्षेत्र प्रभावीपणे काम करून लाखो रुपयांचा निधी नॅशनल ऍग्रो फाउंडेशन तामिळनाडू तसेच सर्पमित्र सुशील विभुते नसरापूर आणि आशा चव्हाण यांचे बंधू शंभूराजे चव्हाण बीड यांच्या सहकार्याने देऊन विकासात भर घातली आहे. सामाजिक उत्तरदायित्व भावनेतून  नॅशनल एग्रो फाउंडेशन तामिळनाडू तसेच सर्पमित्र सुशीला विभुते नसरापूर आणि आशा चव्हाण यांचे बंधू शंभूराजे चव्हाण बीड यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर यांना गुणवत्ता पूर्ण इंग्रजी अध्यापनाबद्दल संगणक संच भेट देण्यात आला.यावेळेस शाळेचे शिक्षक विठ्ठल घोलप व इतर शिक्षक  उपस्थित होते

To Top