बहिणीनेच केला 'वनराज आंदेकरांचा' गेम; भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दिली होती भावलाच 'ठोकण्याची' धमकी.
पुणे (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर दहा ते बारा तरुणांनी पिस्तूल आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. या हल्ल्यामागे दुसरे तिसरे कोणी नसून वनराज आंदेकर यांची सख्खी बहिण आणि मेव्हणा असल्याचे समोर आले आहे. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सख्ख्या बहिणीनेच भावाचा गेम वाजवल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.

