जिद्द फाउंडेशन चा अभिनव उपक्रम
भोर (वार्ताहर):-
जिद्द फाऊंडेशन भोर व श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने आपल्या भोर तालुक्यातील दुर्गम भागातील सर्वसामान्यांसाठी विनामूल्य महाआरोग्य शिबीर 2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता रामबाग हॉल उपजिल्हा रुग्णालयासमोर भोर येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी भोर तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी या महारोग्य शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आणि भोर तालुक्याच्या आदर्श समाजसेविका कविताताई खोपडे यांनी केले आहे.
या महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारच्या रोगांचे निदान,तपासणी,उपचार व शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्या जातील.याच बरोबर मधुमेह,ईसिजी,रक्तदाब,रक्तगट,डोळेतपासणी हिमोग्लोबिन यांची ही तपासणी केली जाईल.तरी जास्तीत जास्त गरजुनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा यामध्ये तज्ञ डॉक्टर नेत्ररोग तज्ञ,दंतरोग तज्ञ ,आस्थिरोग तज्ञ,हृदयरोग तज्ञ,बालरोग तज्ञ,जनरल सर्जन असणार आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना मधील सर्व शस्त्रक्रिया उपलब्ध असणार आहे.
(जिद्द फाउंडेशनचे अध्यक्ष व समाजसेविका कविताताई खोपडे बोलताना म्हणाल्या की,जिद्द फाऊंडेशन भोर व श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने आपल्या भोर तालुक्यातील दुर्गम भागातील सर्वसामान्न्यासाठी विनामूल्य महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.जास्तीत जास्त गरजुनीं या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी भोर तालुक्यातील दुर्गाडी,शिरगाव,रायरी आपटी,हिरडोशी,पिसावरे,महुडे,शिंद व भोर तालुक्यातील विविध गावातील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याची विनंती कविताताई अरुण खोपडे संस्थापक अध्यक्ष जिद्द फाऊंडेशन भोर यांनी केले आहे.)



