जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कवीताताई खोपडे व कोहिनूर ब्युटी इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
भोर (प्रतिनिधी) :-
महिलांच्या सबलीकरणासाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी भोर तालुक्यात विविध बहुआयामी उपक्रम राबवून भोर तालुक्यांमध्ये महिला सक्षमीकरणाची प्रभावी लोक चळवळ राबवून आगामी काळात मोठे सामजिक कार्य उभे करणार असल्याची माहिती जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा कविताताई खोपडे यांनी व्यक्त केले.
जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कवीता खोपडे व कोहिनूर ब्युटी इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला व्यावसायिक कार्यशाळा ब्युटी पार्लर व मेकअप कोर्स ची जुलै 2024 ची बॅच घेण्यात आली होती, यामधे सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भोर तालुक्यातील ग्रामीण व शहर भागांतील महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व प्रशिक्षार्थी यांचे आभार जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा समाजसेविका कविताताई खोपडे मानले.

