रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवप्रहारचे बस स्थानकावर चढून आंदोलन.
भोर (प्रतिनिधी):-
भोर तालुक्यातील कासुर्डी ते तांभाड रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कासुर्डी फाट्यावर बसस्थानकावर चढून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष संतोष मोहिते यांनी शोले स्टाईल आंदोलन केले.भोर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत लेखी पत्र मिळताच आंदोलन स्थगित करण्यात आले.
मोहरी कासुडी ते तांभाड रस्त्यावरील खड्डे जी.एन.बी. व ईमशाल लिक्वीड वापरुन भरणे असे निवेदन प्राप्त झाले आहे. वस्तुतः दिनांक २२ जुलै पासून प्रचंड पाऊस असलेने खड़े भरणेचे काम शक्य झाले नव्हते तथापी पावस्राचे प्रमाण कमी झाल्यास सदर रस्त्यावरील खड़े हे खडी मुरुम अथवा जी. एस. बी. ने भरान घेण्यात येत आहेत.
तरी आपण मागणी केले नुसार ईमर्शल लिक्वीड अथवा डांबरीकरणाने खड्डे बुजविण्याचे काम हे माहे १० सप्टेंबर २०२४ पहिल्या आठवड्यात विनाविलंब करणेत येईल यास्तव संदर्भीय पत्रानुसार आपण आर्दोलन करणेबाबत कळविले असलेने, सदरचे आदोलन मागे घेण्यात यावे असे लेखी पत्र बांधकाम विभाग अधिकारी यांच्याकडुन मिळताच शोले स्टाईल आंदोलन करणारे शिव प्रहार प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी हे आंदोलन मागे घेतले.
आंदोलन स्थळी शिवसेनेचे कुलदीप कोंडे ,भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे, काँग्रेसचे परशुराम मालुसरे, भाजपचे संतोष धावले व नागरिक उपस्थित होते.

