हिंजवडी येथे राजीवजी गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा:-महेश टापरे.

Maharashtra varta

 हिंजवडी येथे राजीवजी गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा:-महेश टापरे.



 पुणे (प्रतिनिधी):-

देशातील सर्वात मोठे आयटीआय  हब असलेल्या हिंजवडी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्क या नावाने जगप्रसिद्ध आहे, तरी आयटी पार्क हिंजवडीच्या फेज एकच्या प्रवेशद्वारावर स्वर्गीय राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा असे आशयाचे  निवेदन प्रादेशिक संचालक एमआयडीसी जोग सेंटर वाकडेवाडी पुणे यांना पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे यांनी लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिंजवडी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्क या नावाने जगप्रसिद्ध आहे हे आपण जाणता हे नाव स्वर्गीय राजीव जी गांधी यांची माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामधील योगदान लक्षात घेऊन दिलेले आहे स्वर्गीय राजीव गांधीजी यांचे योगदानामुळे आपला देश जगभरात अव्वल देश झालेला आहे आयटी पार्क हिंजवडीच्या फेजेच्या प्रवेशावर स्वर्गीय राजे जी गांधी यांचा पूर्ण कृती पुतळा उभारला जावा ही विनंती महेश टापरे यांनी केलेली आहे.

To Top