राजगड तालुक्याचा अभिमान, वै. रामनाना कोकाटे यांचे पावन स्मरण.

Maharashtra varta

 राजगड तालुक्याचा अभिमान, वै. रामनाना कोकाटे यांचे पावन स्मरण



राजगड (प्रतिनिधी): ●विठ्ठल पवार सर●

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीवर, तोरणागडाच्या पायथ्याशी वसलेल्या भट्टी गावातील सरनौबत कोकाटे कुटुंबाचे सुपुत्र, वै. रामनाना कोकाटे यांचे   रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रथम स्मृतिदिन आहे. त्यांचे निधन हे केवळ एका कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण वेल्हे तालुक्याचे अनमोल रत्न गमावल्यासारखे आहे.

प्रीत प्रेम भक्ती हीच जीवनशक्ती

 असा असावा देह चंदनापरी ..

चंदन जळते शितल मंद..

 प्रेरित असा कीर्तीचा सुगंध..

 झिजते तव वात ज्योतीची... 

उजळण्यास सर्व दिशा दाही ...

प्रीत प्रेम भक्ती हीच जीवनशक्ती...

 असा असावा देह चंदनापरी...

या धरतीवर कितीतरी जीव जगतात जन्मतात. आणि वृद्ध होऊन सर्वांचा निरोप घेतात, लक्षात तेच राहतात ज्यांनी आपले जगणे सार्थकी लावले व इतरांसाठी काहीतरी भरीव कार्य केले ,माणसं जोडणं आणि ती आपलीशी करून ठेवणं ही एक अंगभूत कला आहे .ती सर्वांना साध्य होते असे नाही ,माणसं जोडणारा असाच अवलिया आपल्यातून एक वर्षांपूर्वी देवाघरी गेला, त्यांनी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला ,उदंड कीर्ती करून ठेवली...ते राजगड तालुक्याचे नेते रामनाना कोकाटे.

रामनानांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण भागातील जनतेच्या सेवाभावाला समर्पित केले. शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. ते केवळ एक सामाजिक कार्यकर्तेच नव्हते, तर एक उत्तम मार्गदर्शक, प्रेरणादायी व्यक्ती आणि आदर्श नागरिक होते.

हा वटवृक्ष आयुष्यभर इतरांना सावली देत राहिला त्यांना सर्वजण प्रेम आदराने नाना असे संबोधत त्यांचा जीवन परिचय करून देताना त्यांचे जीवन पैलू उलगडून आपल्यासमोर ठेवताना अंतकरण आज जड होत आहे कारण उजेड देणारी पण ती वात संपल्याने विझली आहे.

त्यांच्या दूरदृष्टी आणि कर्तृत्वाने राजगड (वेल्हे) तालुका आज उंचीवर आहे, त्याचे श्रेय रामनाना कोकाटे यांना जाते. त्यांचे कार्य चिरकाल स्मरणात राहील.


नेते येतात आणि जातात ..

आपल्या कार्यातून ते जिवंत राहतात 

जीवन हे कोड आहे,

माणूस त्यातील प्रश्न आहे .

उत्तर शोधणाऱ्या बुद्धिवंतांनो..

राम नाना कोकाटे हे त्याचं शाश्वत उत्तर आहे.


क्षणोक्षणी  आठवते तुमची अपार माया..

आधार होता जणू वटवृक्षाची छाया..

प्रेमळ सहवासाचा गंध अजूनही दरवळतोय ...

तुमच्या स्मृतीत जीव सदैव हळहळतोय....

तुमच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो .....

हीच ईश्वरचरणी प्रार्थना..




 

To Top