30 सप्टेंबर भव्य असहकार मोर्चा.....
पुणे (प्रतिनिधी)
चलो पुणे..........चलो
पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी ,30 सप्टेंबरच्या सामूहिक रजा व भव्य असहकार महामोर्चा आंदोलनात प्रत्येक शिक्षकाने सहभागी व्हाच, सोबतच शालेय व्यवस्थापन समिती,विद्यार्थ्यांच्या पालकाने ही सहभागी व्हावे असे आवाहन करा. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने केले आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 30 सप्टेंबर सामूहिक रजा व भव्य असहकार महामोर्चा. सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने केले आहे
प्रत्येकाच्या मनात खूप खदखद आहे..
ती व्यक्त होऊ द्या मोर्चाच्या माध्यमातून..
➡️ द्विशिक्षकी शाळा एक शिक्षकी करून ठेवली तरी आपण गप्प..
➡️ तीन शिक्षकी शाळा 2 वर आणली, चार शिक्षकी 3 वर.. 4 शिक्षकी 3 वर.. सोबत ग्रेड मुख्याध्यापक पद समाप्त केले तरी आपण गप्प..
➡️ आधार व्हेलीड नाही, शिक्षक जबाबदार, करा अतिरिक्त..
➡️ दर आठवड्याला/ 15 दिवसात एक सरकारी उपक्रम.. केंद्राचा वेगळा, राज्याचा वेगळा..
➡️निरक्षरांचे सर्वेक्षण सारखे अशैक्षणिक काम मागे लावले, तरी आपण गप्प..
नंतर त्या निरक्षरांना शिकवण्यासाठी व त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी काम लावले, तरी आपण गप्प..
➡️एवढच काय तर ते सरळ ते अशैक्षणिक काम असतांना नव्या शिक्षण विभागाच्या gr मध्ये नवभारत साक्षरता या निरक्षरांच्या शिक्षणास शैक्षणिक कामात टाकून रीतसर मान्यता दिली.. म्हणजे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी नाही शिकले नाही तरी चालतील, मात्र 60 वयाचे निरक्षर प्रौढ शिकवा हाच का तो RTE कायदा ?
*आपण अजून किती दिवस गप्प बसणार?*
➡️ शिक्षण क्षेत्रात खाजगीकरण आणले, शिक्षकी पदे कंत्राटी होत आहेत, आज 2 पैकी 1 शिक्षक कंत्राटी आहे, उद्या 2 रा ही कंत्राटी शिक्षक होईल.
बेरोजगार तरुणांच्या नियमित शिक्षक भरत्या न करता त्यांनाही वेठबिगार करण्यात येत आहे.
➡️ शिक्षक वगळून सर्व कर्मचाऱ्यांना 10,20,30 आश्वासित प्रगती योजना 6 वर्षे झाले लागू आहे , पण शिक्षकांना वगळले आहे, ज्यांना 20 व 30 वर्ष लाभ मिळायला हवा होता पण अनेक शिक्षक कोणत्याही वेतन्नोती विना रिटायर्ड झालेत. कधीपर्यंत सहन करणार.?
असे एक ना अनेक विषय आहेत ज्या विरुद्ध आपल्या प्रत्येकाच्या मनात खूप काही साचलेलं आहे..
चला प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त व्हा..
सरकारी शाळा वाचल्या पाहिजेत, शिक्षक व विद्यार्थी टिकला पाहिजे..
30 सप्टेंबरच्या सामूहिक रजा व भव्य असहकार महामोर्चा आंदोलनात प्रत्येक शिक्षकाने सहभागी व्हाच सोबतच शालेय व्यवस्थापन समिती,विद्यार्थ्यांच्या पालकाने ही सहभागी व्हावे असे आवाहन करा. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने केले आहे.