शिक्षकांनो मोर्चात सहभागी व्हा

Maharashtra varta
शिक्षकांनो मोर्चात सहभागी व्हा.




           पुणे (प्रतिनिधी):-संपादक न्यूज वार्ता●

पुणे जिल्हा शिक्षक समन्वय समितीने ( पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना ) सोमवार दिनांक 3O/O9 / 2O24 रोजी सकाळी 11 वाजता पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे तरी  सर्व शिक्षक बंधू भागिनींनी नम्र विनंती करण्यात येते की पुणे जिल्हा शिक्षक समन्वय समितीने पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलन व मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिक्षक एकजूटीची ताकद दाखवून देऊया, सर्व शिक्षक बंधू -भगिनींनी  सामूहिक रजा आंदोलन व मोर्चास जाहीर पाठींबा देऊन मोठया संख्येने पुणे येथे उपस्थित राहावे कोणीही रजा काढून घरी राहू नये संघटना आपल्या पाठीमागे ठामपणे उभ्या आहेत आपणही समन्वय समितीच्या मागे ठामपणे उभे राहून सामूहिक रजा आंदोलन आणि मोर्चा यशस्वी करुन दाखवूया असे आवाहन पुणे जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक  समन्वय समिती संघटना यांनी केले आहे.

To Top