25 सप्टेंबर च्या शिक्षकांच्या विराट मोर्चात आमदार संग्राम थोपटे होणार सहभागी.

Maharashtra varta

 25 सप्टेंबर च्या  शिक्षकांच्या विराट मोर्चात आमदार संग्राम थोपटे  होणार सहभागी.



पुणे( प्रतिनिधी):-संपादक न्यूज वार्ता

भोर  विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे, यांनी  उद्याच्या शिक्षक मोर्चास सक्रियपणे पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे येथे मोर्च्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

त्यांच्यासमवेत पुरंदरचे आमदार मा. संजय जगताप, शिरूर चे आमदार मा.अशोक पवार यांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.मोर्च्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.


उद्या शिक्षकांचा निघत असलेल्या विराट मोर्चा बद्दल

    शिक्षणाच्या माध्यमातून शोषित-वंचितांच्या घडलेल्या पिढ्या आणि त्यातलेच आम्ही... आजही आमच्याच परिवारातील अनेक बांधव आर्थिक दृष्ट्या अजूनही विपन्नावस्थेत आहे, अडचणीत आहे, सामाजिक दृष्ट्या ही दुर्लक्षित आहे अशा सर्वांची किती पुढे कठीण होईल असे दिसत आहे. 

  शिक्षणानेच आमची स्थिती गती सुधारली, वित्तही मिळाले. परंतु या सर्व गोष्टी आता दुरापास्त होण्याची वेळ आली आहे. 

   गोरगरीब वंचितांचे शिक्षणच थांबण्याची आजची स्थिती आहे. या चिंतनीय पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांसाठी- त्यातही आपल्या शाळा टिकल्या पाहिजे,  विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले पाहिजे, आम्हालाही शिकवण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे आणि आम्ही शिकवत नाही अशा प्रकारची जाणीवपूर्वक बदनामी थांबली पाहिजे. यासाठी १५ मार्च व २५ सप्टेंबर चा शासन निर्णय रद्द व्हावा हा आंदोलनाचा प्रधान हेतू आहेच. 

  सोबत विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजनांची अंमलबजावणी..‌ शिक्षकांचे अत्यंत महत्त्वाचे सेवा-आर्थिक विषयक प्रलंबित प्रश्न (सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना किंवा सरसकट निवड श्रेणी, विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता वेतनश्रेणी, शिक्षकांच्या वेतन त्रुटी, जाहिरातीच्या अनुषंगाने १९८२ चे पेन्शन आदेश, मुख्यालय... ), 

शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात अडसर निर्माण करणारे उपद्रवी उपक्रम, Online कामांची बजबजपुरी, शालेय पोषण आहार योजना अशा अनेक गोष्टींमुळे आपण सर्व त्रस्त आहोत. याची सोडून करण्याच्या ऐवजी शासन जाणीवपूर्वक संपूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने- अत्यंत अपरिहार्यतेने २५ सप्टेंबर रोजी हक्काची किरकोळ रजा घेऊन आंदोलनात उतरत आहोत.. मोर्चा काढत आहोत..!_

   आपल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षक म्हणून आपल्यासाठी, आपल्या अस्मितेसाठी, वारंवार शैक्षणिक गुणवत्तेच्या नावाखाली आपली  बदनामी करणाऱ्यांना चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आरसा दाखविण्यासाठी- होत असलेल्या या आंदोलनात आपण सहभागी का होऊ नये..?

    आपला लढा आपल्यालाच लढावा लागेल.. आपल्यासाठी दुसरे कोणीही रस्त्यावर येणार नाही.. मी सेवेत आलो; परंतु माझी सेवा सहज पूर्ण होईल काय.? माझ्या सेवाविषयक लाभांचे काय.? माझी शाळाच नसेल, माझे विद्यार्थीच नसतील; तर मी तरी कसा राहील..? ज्या गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातून असलेला मी शिक्षक झालो आणि सुव्यवस्थितपणे सुखकर जीवन जगत आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गाव खेड्यात नसत्या तर माझे शिक्षण झाले असते का.? दर किलोमीटर-दीड किलोमीटरवर शाळा नसत्या तर इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या का.? गाव-खेड्यातील, वाडी-वस्तीवरील आणि शहरातील दुर्गम भागात बंदिस्त, दुर्लक्षीत परिसरात राहणाऱ्या माझ्या परिवाराला सुखाचे दिवस आले असते काय.?... ते चांगले दिवस आल्यानेच मी माझ्या मुलांचे शिक्षण करू शकलो. घर बांधू शकलो. आजच्या काळातील अनेक सुविधांचा उपभोग घेऊ लागलो.. सर्वात महत्त्वाची म्हणजे आजारपणात चांगली उपचार घेऊ शकतो. 

   _त्या सर्व गोष्टी - माझी भविष्याची सुरक्षितता ज्या माझ्या व्यवसायामुळे मिळाली- ज्या माझ्या जि प, नप, अनुदानित शाळेमुळे मिळाली, ज्या माझ्या विद्यार्थ्यांमुळे मिळाली तेच जर धोक्यात आले असेल तर मी शांत बसून कसा चालेल..?_

   या विदारक परिस्थितीत मी भयावह भविष्य दुर्लक्षित करून आज शांत बसणे ही समाजाप्रती आणि कष्टकरी, कामकरी, गोरगरिब कुटुंबातून येत असलेल्या विद्यार्थ्यांप्रती माझी कृतघ्नताच राहील.

  _या सर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक बांधवाने २५ सप्टेंबरच्या लढ्यात स्वतःला सहभागी करून घेण्यासाठी रजा घ्यावी व पाणी पाऊस याची तमा न बाळगता आवश्यक छत्री/रेनकोट सह "सर्व शिक्षक संघटनांनी" एकत्रित येत काढलेल्या मोर्चात पूर्णवेळ सहभागी व्हावे अशी कळकळीची विनंती महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीने केली आहे.

     




To Top