हातवे खुर्दचे सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक विचारनेतृत्व हरपले ; हातवे खुर्द गावावर शोककळा पसरली.

Maharashtra varta

 हातवे खुर्दचे सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक विचारनेतृत्व हरपले ;  हातवे खुर्द गावावर शोककळा पसरली.


भोर ( प्रतिनिधी):● विठ्ठल पवार सर●

हातवे खुर्द  (ता.भोर )गावाचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गणपत अण्णा गेनबा खुटवड यांचे अकस्मात निधन झाले. त्यांचे वय ५३ वर्षे होते. या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

रेशनिंग दुकानदार संघटनेचे भोर तालुक्याचे सदस्य असलेले गणपतअण्णा खुटवड. हातवे खुर्द गावाच्या सामाजिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यात  कार्यक्रमात कायमच सक्रिय व योगदान देणारे होते. गावाच्या विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. विशेषतः युवकांमध्ये चांगले विचार पेरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ते करीत होते. सामाजिक कार्यकर्ते शंकर गेनबा खुटवड यांचे ते बंधू होत. 

गणपत अण्णा खुटवड यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिवाराला मोठा धक्का बसला आहे. गणपतअण्णा खुटवड यांचे निधनाची बातमी ऐकून संपूर्ण हातवे खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.




To Top