भोर तालुक्यातील नाटंबी येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!
भोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर व त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांवर प्रभावित होऊन भोर तालुक्यातील नाटंबी येथील पद्मावती देवी ट्रस्टचे चेअरमन *श्री.विठ्ठल श्रीपती घाटे* व विकास सेवा सोसायटीचे संचालक *श्री.ज्ञानोबा यदू खोपडे* यांनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला.
यावेळी दादांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन करून पक्षात स्वागत केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक *सुभाषराव कोंढाळकर,* खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन *शिवाजीराव नाटंबे,* विकास सेवा सोसायटी चेअरमन *संदीप शिवाजी जेधे,* यांच्यासह *दशरथ खोपडे, शिवाजी घाटे, सुभाष खोपडे, संतोष खोपडे,* मा.सरपंच *यशवंत खोपडे,* मा.सरपंच *सुनील खोपडे,* तसेच *बाळासो श्रीपती खोपडे, बाळासो नारायण खोपडे, अंकुश खोपडे, सुखदेव नाटंबे* आदी ग्रामस्थ उपस्थित होते.