किशोरदादा येनपुरे यांसकडून ज्ञानगंगा वारकरी संस्थेस मदतीचा हात.
भोर (प्रतिनिधी):-
भोर, राजगड तालुक्यामध्ये ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण व मूल्यांचे संस्कार,आदर्श नागरिक घडविण्याचे काम होत असून समाजामध्ये आदर्श प्रस्थापित करण्याचे काम होतेय ही अभिमानाची व गौरवस्पद बाब आहे असे प्रतिपादन पुण्याचे उद्योगपती किशोर येनपुरे यांनी केले.
करंजावणे ता.राजगड येथे गुरुपौर्णिमेप्रसंगी येणपुरे यांनी ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्थेस भेट देवून संस्थेच्या विकासासाठी रोख रक्कम 25,000. देणगी संस्थेच्या इमारतीसाठी संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.कृष्णा महाराज लिम्हण यांच्याकडे सुपूर्द केली.
या ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्थेस ५५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, पुणे तालुक्यातील हे विद्यार्थी आहेत, त्यातील १५ विद्यार्थी उत्तम रीत्या कीर्तन करतात तर इतर विद्यार्थी गायन व वादन करत आहेत.
( आपल्या परिसरामध्ये काम करणारी ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्थेचे काम मोलाचे आहेत, कृष्णा लिम्हण महाराज यांनी खरोखरच विद्यार्थ्यांच्या हितासाठी व वारकरी मूल्यांच्या संस्कारासाठी अहोरात्रपणे झटत आहे,निस्वार्थीपणे काम करीत आहेत)
.jpg)

