पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अरुण भिलारे यांची निवड.

Maharashtra varta

 पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अरुण भिलारे यांची निवड.



भोर( प्रतिनिधी):- 

पुणे जिल्हा  युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अरुणदादा भिलारे नियुक्ती करण्यात आली.हे नियुक्तीचे पद त्यांना नुकतेच देण्यात आले

भोर राजगड मुळशीचे  आमदार  संग्राम थोपटे ,  जिल्हा नियोजन समिती  मा.सदस्य राहुल लेकावळे आणि भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे व पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे यांच्या उपस्थितीत  पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र  अरुण दादा भिलारे यांना देण्यात आले.

यावेळी मा.जि. परिषद सदस्य विठ्ठल आवाळे व मा. सभापती लहुनाना शेलार, मा.उपसभापती रोहन बाठे,मा. सभापती बाळासाहेब थोपटे ,के.डी. सोनवणे विविध गावचे सरपंच, उपसरपंच सदस्य तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे आजी माजी चेअरमन,व्हाईस चेअरमन , संचालक आणि पदाधिकारी व काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

(या निवडीबद्दल अरुणदादा भिलारे म्हणाले  की,दिलेल्या या जबाबदारी बद्दल आणि  युवक काँग्रेस ने दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच दिलेल्या पदाला योग्य न्याय देण्याचा ठाम विश्वास आपणास देतो,आमदार संग्राम थोपटे ,पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष महेश  टापरे या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त  करतो.

To Top