भोर तालुक्याचा मतदार यादी विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम.

Maharashtra varta

 भोर तालुक्याचा  मतदार यादी विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम.


भोर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

निवडणूक आयोगाकडील दि. ०१/०८/२०२४ रोजीचे पत्रान्वये दि. ०१/०८/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम प्राप्त झालेला आहे. सदर कार्यक्रमानुसार दि. ०६/०८/२०२४ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणेत आली असून, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. ०६/०८/२०२४ (मंगळवार), ते दि. २०/०८/२०२४ (मंगळवार) असा आहे. सदर कालावधीमध्ये दि.१०/०८/२०२४ (शनीवार), दि. ११/०८/२०२४ (रविवार) दिवशी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करणेत आलेली आहेत. तसेच दि. १७/०८/२०२४ (शनीवार), दि. १८/०८/२०२४ (रविवार) यादिवशी सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करणेत येणार आहेत. दि. २०/०८/२०२४ (मंगळवार) ते दि. २९/०८/२०२४ (गुरुवार) पर्यंत दावे व हरकती निर्गत करणे, मतदार यादीचे मापदंड तपासणे आणि अंतिम प्रकाशनासाठी मा. निवडणूक आयोगाची परवानगी घेणे याबाबत कार्यवाही करणेत येणार, असून दि. ३०/०८/२०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणेत येणार आहे.


भोर विधानसभा मतदार संघामध्ये भोर तालुक्यामध्ये २४०, वेल्हा तालुक्यामध्ये ९६ व मुळशी येथे २२८ मतदार नोंदणी अधिकारी यांची नेमले आहेत. या मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे नविन मतदार नोंदणी करणे, मयत मतदारांचे नाव कमी करणे, नावामध्ये दुरुस्ती करणे याबाबतचे फॉर्म भरुन दयावेत. फॉर्म सोबत जन्माचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, इत्यादी व रहिवास पुराव्याकरीता रेशनकार्ड, लाईटबील, ८अ उतारा, बैंक पासबुक, इत्यादी पुरावे जोडणे आवश्यक आहे. मयत मतदाराचे नाव कमी करणेसाठी मयत मयताचा उतारा आवश्यक आहे.


भोर तालुक्यातील मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक दि. १३/०८/२०२४ रोजी पंचायत समिती सभागृह, भोर येथे घेण्यात आली. सदर बैठकीस मा. तहसिलदार भोर, मा. परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसिलदार भोर, निवडणूक नायब तहसिलदार भोर उपस्थित होते. मतदार नोंदणीबददल सविस्तर सूचना मा. मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा मा. उपविभागीय अधिकारी, भोर यांनी दिल्या.


राजकीय पक्षांची बैठक दि. ०८/०८/२०२४ रोजी घेण्यात आली. सदर बैठकीस शिवसेना (उ.बा.ठा.), भारतीय जनता पक्ष, भोर शहर शिवसेना, भोर तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी (अजितदादा गट), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय सहायक यांची नेमणूक करावी व मतदार नोंदणीसाठी मदत करावी असे त्यांना आवाहन मा. मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा मा. उपविभागीय अधिकारी भोरचे , विकास खरात यांनी केले. सर्व मतदारांनी स्वतः Voters Helpline या App व्दारे स्वतःचे नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करुन घ्यावी. त्याचप्रमाणे नविन मतदार स्वतः देखील online अर्ज भरु शकतात असे मा. मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ यांनी सांगितले.


युवा, सोसायटी, विशेष असुरक्षित आदिवासी जमाती (PVTG), भटक्या जाती-जमाती, महिला, दिव्यांग, देहविक्री करणा-या स्त्रिया (FSW), घर नसणारे, जेष्ठ नागरिक, स्थलांतरीत, सैनिक मतदार व तृतियपंथी या मतदारांकरीता दि. १६/०८/२०२४ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेमध्ये विशेष शिबीर तहसिल कार्यालय, भोर, वेल्हा व मुळशी या ठिकाणी आयोजित करणेत आलेले आहे. तरी संबंधित सर्व मतदारांनी या ठिकाणी आपली नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन मा. मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ यांनी केले.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे नाव समाविष्ठ करणे, मयताचे नाव कमी,नावात दुरुस्ती करणेची ही शेवटची संधी असल्याने याचा विशेष लाभ सर्वांनी घ्यावा, अशी विनंती मा.

नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा मा. उपविभागीय अधिकारी, भोर यांनी केली.

To Top