जुनी पेन्शन द्या, मतदान घ्या! सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Maharashtra varta

 जुनी पेन्शन द्या, मतदान घ्या! सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 



पुणे, ता. 12: (पत्रकार टी. पवार )

"पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची', 'नो पेन्शन, नो व्होट' अशा घोषणा देत सरकारी कर्मचाऱ्यांनी आज दुपारी  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जो पक्ष जुनी पेन्शन लागू करेल, त्यालाच मतदान केले जाईल, अशी प्रतिज्ञा घेत यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच  गर्भित इशारा दिला आहे. पुणे जिल्हा परिषद पुणे, पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघाला.


एकच मिशन जूनी पेन्शन अशी घोषणाबाजी करीत कर्मचाऱ्यांनी जूनी सेवानिवृ्त्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवार ता. 12 ऑगस्ट 2024 रोजी  सकाळी  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने कर्मचारी व अधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते

राज्यात सन 2005 नंतर शासकिय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृ्त्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जूनी सेवानिवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी यासह इतर  मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र प्रत्येक वेळी शासनाकडून आश्‍वासनेच देण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

जूनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी ही प्रामुख्याने असणारी मागणी साठी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद पुणे पासून  महामोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत शांततेच्या मार्गाने हा महामोर्चा दुपारी बारा वाजता  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे  सादर करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी व कर्मचारी जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(शिक्षकांनी सादर केलेले पेन्शन गीताने वातावरण दुमदुमून गेले)

पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची या आशयावर आधारित पेन्शन गीत शिक्षकांनी सादर करत उपस्थितांची दाद घेत त्यांना देखील यामध्ये सामावून घेत पेन्शन हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे हे प्रामुख्याने सांगण्यात आला.


To Top