भोर येथे तालुक्यातील विविध प्रशासन अधिकारी समवेत आमदार यांची बैठक संपन्न.

Maharashtra varta

 भोर येथे तालुक्यातील विविध प्रशासन अधिकारी समवेत आमदार यांची बैठक संपन्न.


भोर (प्रतिनिधी):- पत्रकार टी .पवार.

भोर पंचायत समिती,भोर सभागृह येथे तालुकास्तरीय विविध शासकीय समितीचे समन्वयक व संबंधित अधिकारी यांच्या समवेत भोर राजगड मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी  बैठक घेऊन सर्व विभागातील कामांचा  सविस्तर आढावा घेतला.नागरिकांचे असणारे विविध प्रश्न समजावून घेऊन ते प्रशासनासमोर मांडले.तसेच भोर तालुक्यातील प्रस्तावित तसेच प्रलंबित कामांबाबत तात्काळ पूर्णत्वास कार्यवाहीच्या सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी  केल्या.


या प्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, मा.जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, प्रमोद थोपटे, वसंतराव वरखडे, काळुराम मळेकर, अधिकारी वर्ग उपस्थित होता.

To Top