शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप.
नसरापूर( प्रतिनिधी):-●पत्रकार टी .पवार.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यामध्ये प्रभावीपणे काम करत असून शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडत शिक्षकांना न्याय देण्याचे काम गेल्या अनेक वर्ष सातत्याने करीत आहेत, शिक्षक समिती ही शिक्षकांची जिव्हाळ्याची व त्यांच्या समस्या सोडवणारी राज्यातली अग्रगण्य असणारी शिक्षकांची एकमेव संघटना आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस संदीप आप्पा जगताप यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त रामोसवाडी -हातनोशी(ता. भोर ) येथील जिल्हा परिषद शाळेतील १३विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल रंगपेटी या शालेय साहित्याचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षक समिती चे सरचिटणीस संदीप जगताप, शिक्षक नेते सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुरेश कदम, माजी अध्यक्ष संजय पवार तालुका सरचिटणीस सुरेश खोपडे, सहसचिव शरद पवार, मुख्याध्यापक योगेश शिंदे, शिक्षक संध्या पाचूपते,ग्रामस्थ मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.


