करंजगाव मंजूर केलेले अनुज्ञाप्ती रद्द करावी.
राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे शेख यांची मागणी.
पुणे ( प्रतिनिधी):- टी .पवार.
करंजगाव ता. भोर येथे मंजूर केलेले अनुज्ञाप्ती क्रमांक ५२१४४०२/३५५९ रद्द करण्याची मागणी मन्नान शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेले आहे.
पुढे त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की, मौजे करंजगाव ता. भोर येथील गट नंबर 112 मधील घर नंबर 31 या मिळकतीमध्ये आपल्या मार्फत मंजूर केलेली आणून अनुज्ञापती एफ एल थ्री 521 44 02 /35 59 साठी ची कागदपत्रे ही अपुरी व दिशाभूल करणारी आहेत. सदर अनुज्ञप्ती ही 18 जून 2024 रोजी मंजूर केलेली आहे, परंतु अद्याप वर्णन केलेली मिळकतीत बांधकाम पूर्ण झालेले नाही. सदर मंजूर केलेली अनुज्ञप्ती बांधकामाची जागा ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडी पासून अवघ्या दहा मीटर अंतरावर असून सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले दिसून येत नाही, वर्णन केलेल्या जागेचे अकृषिक झालेली नाही, प्रत्यक्षात आपले विभागामार्फत जागेवर पंचनामाही झालेला दिसून येत नाही .सदर अपूर्ण अद्याप चालू असलेले बांधकाम ही नदीपात्रातील पूर निश्चित नियंत्रण रेषेत येत आहे. जागेवर बांधकामच पूर्ण नसताना अनुज्ञप्ती देणे हे बेकायदेशीर असल्याने सदर अनुज्ञप्ती त्वरित रद्द करावी, प्रशासनाची दिशाभूल केल्याने संबंधित इसमावर आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी मन्नान शेख यांनी निवेदनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क चे आयुक्त यांना व राज्याचे गृहमंत्री शंभूराजे देसाई यांना लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे, संबंधित ग्रामपंचायतीने या इसमाला आपण घेतलेल्या परवानगी बाबत माहिती सादर करण्याबाबत कळवले आहे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे

