वेळू ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश पांगारे व उपसरपंचपदी सौ.पुष्पा काळे यांची बिनविरोध निवड.

Maharashtra varta

 वेळू ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश पांगारे व उपसरपंचपदी  सौ.पुष्पा काळे यांची बिनविरोध निवड.


खेडशिवापुर  (प्रतिनिधी):-पत्रकार टी .पवार.

भोर तालुक्यातील  राजकीय दृष्ट्या महत्वाचे समजले जाणाऱ्या वेळू गावच्या सरपंचपदी सुरेश सोपान पांगारे व उपसरपंच सौ.पुष्पा लक्ष्मण काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडीनंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व  नागरिकांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला .

वेळू  ग्रामपंचायत सरपंच  ईश्वर उर्फ हिरामण पांगारे व उपसरपंच सौ.सुजाता खुंटे  यांनी ठरलेल्या मुदतीत सरपंच व उपसरपंच  पदाचा राजीनामा दिला .

गुरुवारी दि. 25 रोजी पार पडलेल्या निवड प्रसंगी  सरपंच रिक्त पदासाठी सुरेश सोपान  पांगारे  व उपसरपंच पदासाठी  पुष्पा लक्ष्मण काळे यांचा एकमेव अर्ज झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली यावेळेस  निवडणूक निर्णय अधिकारी  कोरे मॅडम यांनी काम पाहिले. तलाठी रवींद्र काळे व ग्रामसेवक हरपुडे उपस्थित होते. 

याप्रसंगी सदस्य आप्पासाहेब धनवडे मावळते सरपंच हिरामण पांगारे, अमोल बबन पांगारे, शिवाजी वाडकर, छाया  ज्ञानेश्वर पांगारे संगीता पांगारे ,सुरेखा घुले, सारिका जाधव उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार भोर तालुका काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वर माऊली तात्या पांगारे, उद्योजक जीवन धनावडे, मंगेश सुर्वे, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली पांगारे, दत्तात्रय पांगारे यांनी  केला.

 



To Top