करंदी खे बा. मतदानाचा उच्चांक.

Maharashtra varta

 करंदी खे बा. मतदानाचा उच्चांक.

आज पर्यंतच्या मतदानात विक्रमी मतदान



नसरापूर( प्रतिनिधी):-

आज मंगळवारी बारामती  लोकसभा निवडणुक मतदान  (दि. ७ मे) सकाळी ७ वाजता सुरूवात झाली. या दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघाच्या भोर तालुक्यातील  करंदी खे .बा. गावातील तरुणाईने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत  सहभागी होत, उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. उन्हाची काहिली जाणवत होती,मात्र मतदारांनी ऊन तहान सहन करत त्याची पर्वा न करता  मतदान प्रक्रियेत  भरभरून प्रतिसाद नोंदवला असल्याचे दिसून आले.


लोकसभा निवडणुकीत करंदी खे.बा. गावचे आजपर्यंत एवढे मतदान झाले नाही, की जे या लोकसभा निवडणुकीत मतदान झाले,जवळजवळ 75 टक्के मतदान झाले,गावातील  नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. एका अर्थाने या निवडणुकीत तरुणाई केंद्रस्थानी राहिली. यावेळी तरुणाईची जास्त प्रमाणात लगबग दिसून येत होती. उन्हाचा तडाखा असतानाही तरुण मतदान केंद्रांवरील बुथवर मतदारांचे यादीत नाव आहे की नाही याची शहानिशा करत  समजावून सांगत होते. लोकसभा निवडणुकीत करंदी खे.बा. येथील मतदारांनी मागच्या काळामध्ये  लोकसभा निवडणुकीत जास्तीत  जास्त  60 टक्के मतदान केले होते,मात्र ह्या वर्षी विक्रमी मतदान झाले. एकूण मतदार 999 असून त्यातील  744 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

To Top