गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा भव्य स्वरूपात साजरा
भोर( प्रतिनिधी):-
वारकरी सेवा संघ भोर तालुका वतीने गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. रघुकुल प्रतिष्ठान करंदी खे.बा येथे आश्रमामध्ये मोठ्या भक्तिभावाने बालकीर्तन महोत्सव संपन्न झाला. प्रथमत: सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संत गोरोबाकाका यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उत्सवास सुरुवात झाली.कु.श्रावणी थिटे हिने पंचपदी प्रारंभ करून कु.स्वरदा मुसळे(खोपी) हिची कीर्तन सेवा रुजू झाली.नंतर ह.भ.प.सुरज महाराज भोरडे(वरवे) याने कीर्तन सेवा रुजू केली. नंतर ह.भ.प.शिवराज महाराज जाधव(देगाव) याने किर्तन सेवा रुजू केली याच प्रामुख्याने छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग सांगून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या समारोपाला ह.भ.प स्वराज महाराज गोगावले (ससेवाडी) (इयत्ता तिसरी) या बाल कीर्तनकार आणि सुंदर संत गोरोबाकाकांचे चरित्र सांगून कीर्तन सेवा रुजू केली.चारही बाल कीर्तनकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर भोर तालुक्यातील कार्यकारणी पदी सौ.भारतीताई डिंबळे (खोपी),श्री वाल्हेकर महाराज (कामथडी),धुमाळ सर (नायगाव) यांना नियुक्तीपत्र भोर तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर मान्यवरांची मनोगत होऊन भोर तालुकाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच रघुकुल प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.विलासराव बोरगे यांचा वारकरी सेवा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या सर्व कार्यक्रमासाठी आश्रमाची जागा,सर्वांचा भोजन प्रसाद, व इतर सर्व व्यवस्था,रघुकुल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.रघुकुल प्रतिष्ठानचे सन्माननीय कार्याध्यक्ष संजय महाराज बोरगे यांनी सर्व नियोजनाची व्यवस्था पाहिली.त्यांना करंदी ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले. याप्रसंगी भोर तालुका अध्यक्ष श्री.तानाजी महाराज नाईलकर उपाध्यक्ष श्री.पंढरीनाथ जाधव, उपाध्यक्ष श्री.सतीश कोंडे,हरिभाऊ बाठे,त्यानंतर श्री.खंडेराव भोरडे, श्री.विष्णू चंदनशिव, त्यानंतर श्री.सर्जेराव शिंदे,श्री.जायकर श्री.रांजेकर,श्री.संदीप मुसळे,सौ पुजाताई खाटपे यांनी सर्व कार्यक्रमास पार पाडण्यासाठी खूप कष्ट घेतले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भोर तालुका वारकरी भूषण ज्ञानेश्वरी नाईलकर यांनी केले.
याप्रसंगी वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा सन्माननीय सचिव श्री.दिलीप बाबा खुडे,व वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा सन्माननीय अध्यक्ष श्री.संजय महाराज बोरगे उपस्थित होते. सर्व कीर्तनाला उत्कृष्ट अशी मृदंग साथ यशराज थिटे,पवन चौधरी,आखाडे महाराज यांनी केली. हार्मोनियम साथ श्री.शिवाजी कोंढाळकर ,ओंकार नाईलकर यांनी केली. व ह.भ.प.मयूर महाराज कोंडे(अध्यात्मिक विश्व,खेडशिवापुर) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कीर्तन सेवा रुजू केली. या सोहळ्यास करंदी खे.बा,देगाव,नायगाव,कांबरे, ससेवाडी,मिसाळवाडी,रांजे,वरवे या गावातील भाविक उपस्थित होते.सर्वांचे भोजन प्रसाद होऊन कार्यक्रम संपन्न झाला...

