सुवर्णा मोरे यांच्या व्हिडिओस राज्यस्तरीय प्रथम मानांकन

Maharashtra varta

सिने अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते सुवर्णा मोरे  यांनी प्रथम क्रमांक पारितोषिक 

सुवर्णा मोरे यांच्या व्हिडिओस राज्यस्तरीय प्रथम मानांकन



पुणे( प्रतिनिधी):-

सपना काकडे यांच्या फेसबुक ग्रुप सुयोग वेंचर्स या फेसबुक पेजला एक अप्रतिम  स्पर्धा आयोजित केली होती ,या स्पर्धेमध्ये पुण्याच्या आदर्श व प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सुवर्णा मोरे यांच्या अप्रतिम आशय लाभलेल्या  व्हिडिओस प्रथम मानांकन मिळाले, त्याबद्दल सुवर्णा मोरे यांचा प्रसिद्ध सिने अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेत आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या आपल्या मदनतनीस यांच्या बद्दल माहिती लिहून त्यांचा आपल्या सोबतचा एक फोटो पोस्ट करायचा होता, यामध्ये  पुण्याच्या  सुवर्णा मोरे व  दीपाताईंचा आणि सुवर्ण एक छानसा दृष्ट काढताना चा व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओला खूप लाईक आणि कमेंट्स लाखो व्युज  मिळाले, त्यामुळे या स्पर्धेची ,या स्पर्धेमध्ये सुवर्णा मोरे  विनर झाले या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण  दि. एक मे 2024 रोजी  महाराष्ट्र दिनी  सातारा रोड सिटी प्राईड येथे "नाच ग घुमा "या मूवीच्या प्रमोशनसाठी स्वप्निल जोशी, सारंग साठे सुकन्या कुलकर्णी तसेच त्यांची पूर्ण टीम हे उपस्थित होते .त्याचप्रमाणे आपला आवाज आपली सखीच्या संगीता तरडे सुयोग वेंचरच्या सपना काकडे तसेच या स्पर्धेच्या स्पॉन्सर आणि राजदुर्गा क्रिएशनच्या ओनर अर्चना मसुरेकर आणि आदी मान्यवर व सर्व टीम उपस्थित होते.


कोण आहेत सुवर्णा मोरे)

 पुणे येथील रहिवासी असणाऱ्या सुवर्णा मोरे ह्या सामाजिक क्षेत्रात पुणे शहर व जिल्ह्यात  विविध सामाजिक उपक्रमांतुन जनजागृती करत आहेत,  सोशल मीडियावर जनजागृती बाबत अनेक व्हिडीओ आहेत,आजच्या तरुणाईने स्वतःबरोबर समाज जागृती करावी,सामाजिक बांधिलकी जोपासावी ,महिलांनी ,युवकांनी  पुढे यावे ,त्यांचे सक्षमीकरण व्हावे,यासाठी सुवर्णा मोरे यांनी कायम धडपड सुरू आहे,त्यांच्या कार्याची दखल अनेक सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांना शेकडो पुरस्कार  मिळाले आहे,एका विवाहात त्यांनी वधू वरास आणि हजारो वऱ्हाडी मंडळींना मतदानाची शपथ देण्याचा त्यांच्या या उपक्रमाची  न्यूज चॅनेलवाले यांनी दखल घेतली, निवडणूक आयोगाने देखील त्यांच्या या कामाचे विशेष कौतुक केले आहे.



To Top