उदय बोरगे यांचे निधन

Maharashtra varta

              

          ●उदय बोरगे यांचे निधन●


नसरापूर (प्रतिनिधी):-●पत्रकार विठ्ठल पवार.●

करंदी खे.बा. ता. भोरचे उदय रवींद्र बोरगे  (वय -29)यांचे आकस्मिक  निधन झाले.

करंदी खे.बा. गावचा अत्यंत हुशार ,विनम्र,संवेदनशील मनाचा उदयचा स्वभाव होता, शाळेला चांगलं डोकं असणारा होता,सर्वांवर भरभरून प्रेम करणारा होता.,आपल्या कुटूंबाप्रती आस्था ठेवत, आपल्या कुटुंबाचा नावलौकिक व्हावा, यासाठी त्याने उच्च शिक्षण घेतले, उदय शाळेला हुशार आहे, हे पाहून उदयच्या शिक्षणाला त्याच्या आई-वडिलांनी विशेष वाव दिला आणि त्यासाठी त्याला शिक्षणासाठी लागणारा सर्वतोपरी खर्च  ,कष्ट आई-वडिलांनी, केले. अनंतराव थोपटे महाविद्यालय,भोर  त्यांने एम फार्मचे  शिक्षण पूर्ण केले, पुढे रिलायन्स लाइफ सायन्स नवी मुंबई येथे एक्झिक्यूटिव्ह म्हणून मोठ्या कंपनीत उच्च पदावर  काम करीत होता, उदयच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबाला तसेच गावाला मोठा धक्का बसला आणि करंदी खे.बा. गाव हे शोककळेमध्ये बुडाले.10 दिवसापूर्वी करंदी खे। बा ।चे संदीप अशोक बोरगे  यांचे निधनाला 10 दिवस व्हायचे,  आत ही दुसरी घटना गावाला दुःख देणारी ठरली,दोन्ही तरुण व्यक्तीचे जाण्याचे दुःख खूप मोठे आहे,

त्यांच्या मागे  आई वडील, 2 भाऊ असा परिवार आहे, त्यांच्या आकस्मिक निधनाने  बोरगे कुटुंबीयांना ,मित्र परिवाराला नातेवाईक यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

Tags
To Top