●संदीपभाऊ बोरगे यांचे निधन●
नसरापूर (प्रतिनिधी):-●पत्रकार विठ्ठल पवार.●
करंदी खे.बा. ता. भोरचे सामाजिक कार्यकर्ते व भोंगवली गणाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संदीप अशोक बोरगे (वय -45)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
करंदी खे.बा. गावच्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच संदीप बोरगे यांचा मोलाचा वाटा होता, प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होणे,, विकासासाठीचे त्यांची तळमळ होती,भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून भोर तालुक्यात त्यांची ओळख होती.त्यांचा मित्र परिवार मोठा होता.
त्यांच्या मागे पत्नी, मुली, आई वडील असा परिवार आहे, त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांना मित्र परिवाराला नातेवाईक यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

