आयोगाचे निर्देशाचे पालन काटेकोरपणे करा:- राजेंद्र कचरे
203 भोर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न
नसरापूर( प्रतिनिधी)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचारी यांनी करून मतदान प्रक्रिया सुरळीत संपन्न करा असे आवाहन राजेंद्र कचरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी203 भोर विधानसभा मतदारसंघ SMLT तथा उपजिल्हाधिकारी यांनी केले.
अभिजीत मंगल कार्यालय भोर येथे 203 भोर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले.राजेंद्र कचरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 203 भोर विधानसभा मतदारसंघ SMLT तथा उपजिल्हाधिकारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना उत्कृष्टरित्या मार्गदर्शन प्रशिक्षण दिले .
यावेळी प्रशिक्षणात राजेंद्र कचरे म्हणाले की, भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संदेशवाहक (रायडर) नेमण्यात आले आहे. त्यासोबत स्थानिक पातळीवर कार्यरत ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आदींची मदत घ्यावी. मतदानाच्या दिवशी तांत्रिक अडचण असल्यास तात्काळ वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन स्थानिक पातळीवर ती तात्काळ दूर करावी. मतदान केंद्राबाबत दर दोन तासांनी माहिती प्राप्त होईल, असे नियोजन करावे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी कर्तव्य बजावत असताना भारत निवडणूक आयोगाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे.
यावेळी ईव्हीएमचे बॅलेट युनिट व कंट्रोल ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी, मतदान केद्रांची रचना, मतदान साहित्याची वाहतूक, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, अभिरूप मतदान (मॉकपोल), मतदानाच्या वेळी आदर्श आचारसंहितेचे पालन आदीबाबत राजेंद्र कचरे यांनी माहिती दिली. तसेच यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी भोरचे तहसीलदार सचिन पाटील व नायब तहसिलदार अरुण कदम उपस्थित होते.

