मला खासदार करा,५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करतो:- शिवाजी नाना नांदखिले.

Maharashtra varta

 मला खासदार करा,५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करतो:- शिवाजी नाना नांदखिले.



पुणे( प्रतिनिधी):-टी .पवार.

महाराष्ट्र राज्यात  बऱ्याच ठिकाणी  शेतीसाठी पाणी नाही ?,पिण्यासाठी पाणी नाही ?,पाणी नाही म्हणून व्यवसाय बंद पडला आहे ?,पाणी अभावी पिके जळून चालली आहेत ?,नदी,धरण कोरडे पडले आहेत ?ही वास्तवता राज्यात आपल्याला पाहण्यास मिळत आहे.

राज्यातील पाण्याची व दुष्काळाची चिंता नागरिकांनी आगामी काळात कोणीही करू नये, मला एकदा खासदार करा,५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करून दाखवितो असे प्रतिपादन भारतीय जवान किसान पार्टीचे 35 बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी रामभाऊ  नांदखिले यांनी केले आहे,

ता. भोर भोर शहरामध्ये जय जवान माजी सैनिक संघटना व जय जवान माजी सैनिक संघटना धनकवडी आंबेगाव पठार पुण्याचे विलास दामगुडे व पदाधिकारी व भोरचे अध्यक्ष नानासाहेब समगिर व पदाधिकारी यांची उमेदवार शिवाजी नांदखिले यांनी बैठक घेऊन मनोगत व्यक्त केले,त्याप्रसंगी ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की आमच्या भारतीय जवान किसान पार्टीचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या व शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देणे व शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला जाईल ,पेट्रोल डिझेल सीएनजी एलपीजीचे भाव सर्वसामान्यांचे आवाकाच्या बाहेर गेले ते कमी करण्यासाठी ,शिक्षणाच्या खर्चाने सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे, तो कमी करण्यासाठी ,महिलांना सुरक्षा देण्यासाठी,  युवकांना रोजगार मिळण्याकरता पाच लाख कोटींची तरतूद बजेटमध्ये केली जाईल ,भारतीय युवकांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी एजंट मार्फत न पाठवता सरकारमार्फत पाठवले जाईल, सर्व बेघर कुटुंबांना घरकुल देण्यात येईल, बरेचसे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी स्थापन केलेली आहे ,त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जवान किसान पार्टीचे मी शिवाजी नांदखिले उमेदवार असून माझे चिन्ह  गिफ्ट पॅकेट आहे असे सांगून  त्यांनी भोर ,वेल्हे पुणे शहर येथील माजी सैनिकांशी संवाद साधला,नांदखिले यांनी भोर तालुक्यातील शेतकऱ्यांशी,नागरिकांशी  सवांद  साधून आपला मनोदय व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, व सामाजिक प्रश्नांविरोधात गेली 30 वर्षं अधिक काळ महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांचे भरीव कार्य सुरू आहे. शिवाजी नांदखिले हे बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.


बारामती मतदार संघातील भोर व वेल्हा येथे माजी सैनिक कार्यालय येथे ३५- बारामती मतदार संघाचे लोकसभा उमेदवार .शिवाजी रामभाऊ नांदखिले यांच्या लोकसभा प्रचार सभा “जय जवान,जय किसान” नारा देत लोकसभा उमेदवार व उद्याचे खासदार शिवाजीनाना आहेत व आपण त्यांना निवडूण आणायचे आहेच व आपण त्यांना निवडूण आणूच असे सांगत प्रचार सभा पार पाडली.


यावेळी उपस्थीत,३५-बारामती मतदार संघाचे लोकसभा उमेदवार

.शिवाजी रामभाऊ नांदखले.

नानासाहेब भाऊसाहेब समगीर(मेजर)

संस्थापक,माजी सैनिक विकास व सेवा संस्था.,विलास दामगुडे(मेजर)

भारतीय जवान किसान पार्टी हे उपस्थित होते.

To Top